....म्हणून 32 वर्षांचा तरुण अभिनेता झाला 324 वर्षांचा वृद्ध

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 10:01 PM
bollywood star rajkummar rao 32 plays a 324 year old man in raabta movie

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूत आणि कृति सेनन यांचा अपकमिंग ‘राबता’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून सिनेमातील कृति आणि सुशांत यांच्या अभिनयाची सर्वत्रच चर्चा रंगली. पण या ट्रेलरमध्ये असाही एक अभिनेता आहे, ज्याला कुणीही ओळखलं नाही. कारण 32 वर्षांच्या या तरण्याबांड अभिनेत्याला चक्क 324 वर्षांचा वृद्ध दाखवण्यात आलं आहे.

‘क्वीन’ आणि ‘ट्रॅप्ड’ आदी सिनेमांमधील आपल्या दमदार अभिनयाने राजकुमार रावने साऱ्यांचेच लक्ष वेधलं होतं. पण ‘राबता’ सिनेमात 32 वर्षीय अभिनेत्याला 324 वर्षांचा वृद्ध व्यक्ती दाखवण्यात आलं आहे.

याबाबत सिनेदिग्दर्शक दिनेश विजान यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, ”32 वर्षांच्या राजकुमारला 324 वर्षांचा वृद्ध दाखवणं अतिशय अवघड होतं. ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला मेकअप आणि तयार होण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार होता. पण राजकुमारने ते केलं. प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीनं त्याचं रुपच पालटलं होतं. त्याला कुणीही ओळखू शकत नव्हतं.”

 

”या व्यक्तीरेखेसाठी मेकअपचा फायनल लूक निवडण्यापूर्वी जवळपास 16 प्रकारच्या मेकअप लूक टेस्ट कराव्या लागत होत्या. तसेच हा मेकअप करण्यासाठी लॉस एंजेल्सहून मेकअप अर्टिस्टची टीम आणावी लागली. शिवाय ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी  राजकुमारने आपल्या आवाजवरही भरपूर मेहनत घेतली,” असल्याचं दिनेश विजान यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे या व्यक्तीरेखेबद्दल अभिनेता राजकुमार म्हणाला की, ”एका अभिनेत्यासाठी हे सर्व अतिशय मजेशीर असतं. दिनेश यांचा एक दिग्दर्शक म्हणून दृष्टीकोन स्पष्ट होता. या प्रकारच्या मेकअपसाठी 4 ते 5 तास वेळ द्यावा लागतो. शिवाय घामानं अक्षरश: मी निथळून निघत होतो. त्यामुळे मला यासाठी माझ्या मनावर खूप नियंत्रण ठेवावं लागत होतं.”

या सिनेमाचं ट्रेलर सोमवारी रिलीज झालं असून, कृति आणि सुशांत यांची प्रेककथा वेगवेगळ्या काळातील दाखवली गेली आहे. हा सिनेमा 9 जून रोजी रिलीज होणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहा

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:bollywood star rajkummar rao 32 plays a 324 year old man in raabta movie
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर

आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट
आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?
'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या