'ठुमरीची राणी' गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण गिरीजा देवी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.

'ठुमरीची राणी' गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड

कोलकाता : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण गिरीजा देवी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोलकात्यातील बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

गिरीजा देवी बनारस घराण्यातील शास्रीय गायिका होत्या. शास्रीय संगीतातील ठुमरी गायन प्रकारात त्यांचा विशेष नावलौकीक होता. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे त्यांना 'ठुमरीची राणी' म्हणूनही ओळखलं जात होतं.

गिरीजा देवी यांना 1972 साली पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर 1989 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

गिरीजा देवी यांचे वडीलही उत्तम हार्मोनियम वादक होते. त्यामुळे संगीताचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी गायक आणि सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून ख्याल आणि टप्पाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं.

ठुमरी शिवाय कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत आदी विविध गायन प्रकारातही त्यांचं विशेष प्रभुत्व होतं.

त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV