'क्राईम पेट्रोल'फेम अभिनेत्याची मेव्हणीच्या घरी आत्महत्या

By: | Last Updated: > Wednesday, 14 December 2016 3:12 PM
‘Crime Patrol’ actor Kamlesh Pandey commits suicide

नवी दिल्ली : सोनी वाहिनीवरील सुप्रसिद्ध शो ‘क्राईम पेट्रोल’मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता कमलेश पांडेने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. छातीवर गोळी झाडून कमलेशने आपलं आयुष्य संपवल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. आत्महत्या घडली त्यावेळी कमलेशसोबत त्याची मेव्हणीही उपस्थित होती. काहीच दिवसांपूर्वी कमलेशची मेव्हणी अंजनी चतुर्वेदी यांच्या मुलीचं लग्न झालं. मात्र लग्नाला आमंत्रित न केल्याने कमलेश नाराज होता.

घटनेच्या दिवशी कमलेशने मद्यपान करुन धिंगाणा घातला. नशेतच त्याने पिस्तुल काढून हवेत गोळी झाडली. त्यानंतर स्वतःच्या छातीवरही एक गोळी झाडली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस आणि रुग्णवाहिकेला बोलावलं. मात्र तोपर्यंत कमलेशचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी आत्महत्येची नोंद केलेली असली, तरी पोस्टमार्टम अहवालानंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे. कमलेशच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.

First Published:

Related Stories

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’

शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज
शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज

मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन

जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर
VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर

मुंबई : काजोल आणि धनुष यांची भूमिका असलेल्या ‘वेलै इल्ला

मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक
मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक

मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी

बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...
बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...

मुंबई : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवरची कमाई