'दंगल गर्ल' झायराशी विमानात छेडछाड, केबिन क्रूचा कानाडोळा

विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने झायरा दिल्लीहून मुंबईला येत होती. त्यावेळी विमानात झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप झायराने केला आहे.

'दंगल गर्ल' झायराशी विमानात छेडछाड, केबिन क्रूचा कानाडोळा

मुंबई : 'दंगल' सिनेमात 'धाकड गर्ल' साकारणारी अभिनेत्री झायरा वसिम छेडछाडीच्या प्रकारामुळे रडकुंडीला आली. दिल्ली-मुंबई विमान प्रवासात सहप्रवाशाने आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप झायराने केला आहे.

विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने झायरा दिल्लीहून मुंबईला येत होती. त्यावेळी विमानात झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. विशेष म्हणजे या प्रकाराची विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार देऊनही कुणीही आपल्या मदतीला न आल्याचा दावा तिने केला आहे.

सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्याने पुन्हा असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. मी व्हिडिओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नसल्याचं झायरा म्हणाली.

सीटच्या मागून हा इसम झायराच्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. केबिन क्रू किंवा विमानातील सहप्रवाशी आपल्या मदतीला न आल्याचंही झायराने सांगितलं.

Zaira Wasim Insta 6

Zaira Wasim Insta 1 Zaira Wasim Insta 2 Zaira Wasim Insta 3 Zaira Wasim Insta 4 Zaira Wasim Insta 5

झायराच्या तक्रारीला कोणीही दाद न दिल्यामुळे तिने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर इन्स्टाग्राम लाईव्हवरुन आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार सांगताना झायरला अक्षरशः रडू कोसळलं. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिनाअश्रू अनावर झाले. संबंधित प्रवाशावर आता कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dangal actress Zaira Wasim molested on flight, cries in an Instagram live video latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV