संरक्षण मंत्रालयाने 'अय्यारी' चित्रपटात बदल सुचवले

'अय्यारी' सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते बदलण्यास सांगण्यात आले आहेत. अर्थात ती दृश्य काय आहेत, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयाने 'अय्यारी' चित्रपटात बदल सुचवले

मुंबई : नीरज पांडेंच्या 'अय्यारी' चित्रपटाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी अय्यारी पाहून काही बदल सुचवले आहेत. त्यामुळे अय्यारी सिनेमाची रिलीजींग डेट पुढे ढकलली जाण्याची चिन्हं आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला अय्यारी चित्रपटाचं कथानक लष्करातील भ्रष्टाचारावर आधारित आहे. आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतली होती.

शनिवारी संरक्षण मंत्रालयासाठी 'अय्यारी' सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारीही या शोला उपस्थित होते. मात्र चित्रपट पाहून त्यांनी या सिनेमाला हिरवा कंदील दिलेला नाही. चित्रपटात काही बदल करण्यास निर्मात्यांना सुचवण्यात आलं आहे.

सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते बदलण्यास सांगण्यात आले आहेत. अर्थात ती दृश्य काय आहेत, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

अय्यारी हा चित्रपट सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यासारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. मात्र आता ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अय्यारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, राकुल प्रीत सिंह, कुमुद मिश्रा, पूजा चोप्रा, आदिल हुसैन आणि विक्रम गोखले यांच्यासारखे कसलेले कलाकार आहेत.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपटालाही अशाच विरोधाचा सामना करावा लागला होता. अखेर नावातील 'आय' हे अक्षर काढून, घुमर चित्रपटात दीपिका कंबर झाकून, डिस्क्लेमर जारी केल्यावर हा सिनेमा 25 जानेवारीला रीलिज झाला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Defense Ministry suggests modifications in Aiyaary latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV