'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

'रिलेशनशीपमध्ये जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, तेव्हा काही गोष्टी घडतात. याचा अर्थ तो बलात्कार होता, असा होत नाही, असं महमूद फारुकी यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : 'पीपली लाईव्ह' चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी यांची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अमेरिकन संशोधक महिलेने फारुकींवर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाने सोमवारी फारुकींची बलात्काराच्या आरोपातून सुटका केली.

बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेले महमूद फारुकी यांना सात वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाने तिहार जेलमधून त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

खंडपीठाने बलात्कार प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली. घटनेच्या वेळी पीडितेच्या संमतीविना शारीरिक संबंध ठेवले का, असा प्रश्न कोर्टाने विचारला. तक्रारदार महिलेने संमती दिली नसल्याचं आरोपीला समजलं होतं का, असंही हायकोर्टाने विचारलं.

'त्या दिवशी असं काही झालंच नाही' असा दावा महमूद यांच्या वकिलाने कोर्टात केला. तक्रार नोंदवण्यापूर्वी अमेरिकन तरुणीने फारुकींना केलेले मेसेजेसही वकिलाने कोर्टात सादर केले. जानेवारी 2015 पासून दोघं जण रिलेशनशीपमध्ये असल्याचंही वकिलांनी सांगितलं.

'रिलेशनशीपमध्ये जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, तेव्हा काही गोष्टी घडतात. याचा अर्थ तो बलात्कार होता, असा होत नाही. तक्रारदार महिलेचा जबाब तिने सादर केलेल्या पुराव्यांशी विसंगत आहे' असंही वकिलांनी कोर्टात सांगितलं.

पीपली लाईव्हच्या सहदिग्दर्शकाला सात वर्षांचा तुरुंगवास


दिल्ली पोलिसांनी वकिलांच्या मुद्द्याला विरोध केला. बलात्कार झाल्याचं कोर्टात सिद्ध झालं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर जस्टिस अशोक कुमार यांनी निकाल राखून ठेवला होता.

2015 मध्ये 35 वर्षीय कोलंबिया विद्यापीठातील अमेरिकन तरुणीने फारुकींविरोधात न्यू फ्रेण्ड्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दिल्लीतील सुखदेव विहारमध्ये फारुकींनी बलात्कार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी सात वर्षांचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये महिलेला देण्याचे आदेश ट्रायल कोर्टाने दिले होते.

28 मार्च 2015 रोजी दारुच्या अंमलाखाली फारुकी यांनी बलात्कार केल्याचं कोर्टात सिद्ध झालं होतं. पीपली लाईव्ह सिनेमाची मुख्य दिग्दर्शक अनुषा रिझवी या महमूद यांच्या पत्नी आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV