धनुषचे खरे आई-वडील कोण? अखेर निकाल लागला

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 3:50 PM
धनुषचे खरे आई-वडील कोण? अखेर निकाल लागला

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता धनुषचे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या दाम्पत्याचा खोटारडेपणा उघड पडला आहे. पालकत्वाचा वाद धनुषने जिंकला असून मद्रास हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्यानं आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला होता. थिरुप्पुवनम गावातील 65 वर्षीय कथिरेसन आणि 53 वर्षीय मीनाक्षी यांनी धनुष आपला मुलगा असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. धनुषच्या वकिलांनी मात्र हा पैसे उकळण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचं सांगितलं होतं.

धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. 18 नोव्हेंबर 2004 ला धनुषचा रजनीची कन्या ऐश्वर्याशी लग्न केलं. धनुष-ऐश्वर्याला यात्रा आणि लिंगा अशा दोन मुली आहेत. धनुषने दंडाधिकारी न्यायालयातील याचिका रद्द करण्याची मागणी चेन्नई हायकोर्टात केली होती.

अभिनेता धनुषचे खरे आई-वडील कोण? वाद कोर्टात

धनुष हा आपला तिसरा मुलगा आहे. आमच्या उदरनिर्वाहासाठी त्याने आम्हाला महिन्याला 65 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी दाम्पत्याने आपल्या याचिकेत केली होती.

धनुष शाळेत असताना लहानपणीच घर सोडून पळाला होता. चेन्नईत जाऊन सिनेजगतात काम करण्यासाठी त्याने घर सोडलं होतं. आम्ही शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र सिनेमामध्ये दिसल्यानंतर आम्ही त्याला ओळखलं, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.

धनुष अकरावीत असताना हॉस्टेलमधून पळून गेला होता, असं या दाम्पत्याने नोव्हेंबर 2016 मध्ये सांगितलं होतं. धनुषच्या गळ्याच्या उजव्या बाजुला एक तीळ आहे, तर उजव्या मनगटावर व्रण आहे, असा दावा दाम्पत्याने केला होता. या दोन्ही जन्मखुणांविषयी शाळा हस्तांतरण दाखल्यात माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

धनुषच्या शरीरावरील खुणा तपासा, पालकत्वाच्या वादाला नवं वळण

28 फेब्रुवारीला सरकारी डॉक्टरांकडून धनुषच्या शरीरावरील जन्मखुणांची तपासणी झाली. मदुराईतील राजाजी सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. डीएनए टेस्टला धनुषने नकार दिला होता, मात्र धनुषच्या शरीरावर कोणत्याही जन्मखुणा आढळल्या नाहीत. गळ्यावरील तीळ लेसर तंत्रज्ञानाने काढून टाकता येऊ शकतो, मात्र व्रण हटवता येऊ शकत नाहीत, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.

‘कस्तुरी राजा हे धनुषचे बायोलॉजिकल पिता नाहीत. हॉस्टेलमधून पळून गेल्यावर त्याने कस्तुरी राजांकडे आश्रय घेतला. सुरुवातीला तो नोकर म्हणून राहत होता. मात्र सिनेमात त्याला मिळालेलं यश पाहून कस्तुरी राजांच्या कुटुंबीयांनी त्याला स्वीकारलं’ असा दावा या दाम्पत्याने केला आहे.

First Published:

Related Stories

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज

मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे

'इंदु सरकार'वर ज्योतिरादित्य शिंदेंचा आक्षेप, दिग्दर्शक मधुर भांडारकरचं उत्तर
'इंदु सरकार'वर ज्योतिरादित्य शिंदेंचा आक्षेप, दिग्दर्शक मधुर...

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील ‘इंदु

अक्षय कुमार बनणार ‘पंतप्रधान’?
अक्षय कुमार बनणार ‘पंतप्रधान’?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ लवकरच

उसके साथ जीने का एक मौका दे दे.. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी ट्विस्ट
उसके साथ जीने का एक मौका दे दे.. अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी...

मुंबई : नवोदित भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवच्या आत्महत्या

अजय देवगनच्या अॅक्शन थ्रिलर 'बादशाहो'चा टीझर रिलीज
अजय देवगनच्या अॅक्शन थ्रिलर 'बादशाहो'चा टीझर रिलीज

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मिलन लुथरिया यांचा अपकमिंग

'इंदु सरकार'साठी NOC ची गरज नाही, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचं मत
'इंदु सरकार'साठी NOC ची गरज नाही, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचं मत

मुंबई : एकीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारीत

जेव्हा बाहुबलीसाठी वरुण धवन कटप्पा बनतो...
जेव्हा बाहुबलीसाठी वरुण धवन कटप्पा बनतो...

मुंबई : ‘बाहुबली 2’ रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही हा

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा

मुंबई : प्रदर्शनाआधीच वादात सापडलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’