'ट्यूबलाईट'च्या कमाईने निराश केलं : कबीर खान

'ट्यूबलाईट'च्या कमाईने निराश केलं : कबीर खान

मुंबई : ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमाने भारतात केवळ 120 कोटींचीच कमाई केली. पहिल्या तीन ते चार दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या सलमानच्या सिनेमाची ही कमाई अत्यंत कमी आहे.

या कमाईमुळे आपण नाराज असल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. तुम्ही खूप प्रेमाने आणि आस्थेने सिनेमा बनवता. पण सिनेमा चालत नाही तेव्हा जी अपेक्षा असते ती पूर्ण होत नाही, असं कबीर खान म्हणाला.

कबीर खान आणि सलमाने आतापर्यंत तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' आणि 'ट्यूबलाइट' या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. दोघे चांगले मित्र म्हणूनही परिचित आहेत.

आम्ही एकमेकांचा आदर करतो. मला वाटतं की त्याच्यात काही तरी खास आहे आणि त्याला वाटतं की मी कोणत्याही भूमिकेला चांगल्या पद्धतीने सादर करु शकतो. मी देखील त्याला एका कलाकाराच्या रुपात पाहतो, जो कोणत्याही भूमिकेला न्याय देऊ शकतो, असं कबीर खानने सांगितलं.

आम्ही दोघं जेव्हा एकत्र काम करतो, तेव्हा काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो, असंही कबीर खान म्हणाला.

‘ट्यूबलाईट’च्या अपयशानंतर वितरकांनी सलमानकडून नुकसान भरपाईची मागणी केल्याचंही वृत्त होतं. शिवाय सलमानने वितरकांना नुकसान भरपाई दिल्याचीही माहिती आहे.

सलमानने वितरकांना 55 कोटी रुपये परत करण्याचं मान्य केलं. ‘ट्यूबलाईट’ने केवळ 120 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जी अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘सुलतान’ने पहिल्याच आठवड्यात 208.82 कोटींची कमाई केली होती.

संबंधित बातमी : ट्युबलाईटच्या वितरकांना सलमानकडून 55 कोटींची भरपाई

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV