‘शांताबाई’, ‘बाबूराव’नंतर आता ‘डीजे काळूराम’चा बोलबाला

योगेश खिलारे, स्मिता पाटील आणि रिंकू गोसावी यांच्या नृत्याने या गाण्याला वेगळीच नजाकत प्राप्त झाली आहे.

‘शांताबाई’, ‘बाबूराव’नंतर आता ‘डीजे काळूराम’चा बोलबाला

मुंबई : ठेका धरायला लावणारी मराठी गाणी कमी नाहीत. मात्र अशी नेमकीच गाणी असतात, जी वेगवेगळ्या कार्यक्रमात आवर्जून वाजताना दिसतात. गेल्या काही दिवसात ‘शांताबाई’, ‘बाबूराव’, ‘झिंगाट’ या गाण्यांचा समावेश करता येईल. आता याच यादीत ‘काळूराम’ची एन्ट्री झाली आहे.

‘डीजे काळूराम’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे.

Kalooram 1

“गाण्याच्या बोलावर, डीजेच्या तालावर... ढाकचिक ढाकचिक करुन ढिनचँग करुन साऱ्यांचा काढलाय घाम... शांता, शाळू, बाबूरावाला नाचवतो काळूराम...” असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहेत.

योगेश खिलारे, स्मिता पाटील आणि रिंकू गोसावी यांच्या नृत्याने या गाण्याला वेगळीच नजाकत प्राप्त झाली आहे.

सचिन, शैलेश आणि संदीप या त्रिकुटाने या गाण्याला संगीत दिलं आहे, तर गायक सचिन येवलेंचा आवाज या गाण्याला आहे. विकास कुचेकर यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

गाण्याचा व्हिडीओ :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: DJ Kalooram song viral on social media latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV