अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा थिएटरमध्ये विनयभंग

मराठी सिनेसृष्टीचे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा थिएटरमध्ये विनयभंग

मुंबई : मराठी सिनेसृष्टीचे दिवंगत सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये विनयभंग केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

प्रिया बेर्डे यांच्या तक्रारीनुसार, "आरोपी आणि त्याच्यासोबत असलेले तीन जण मद्यधुंद अवस्थेत होते. संध्याकाळी 5.30 वाजताचा शो सुरु झाल्यानंतर आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर थिएटरमधील इतर प्रेक्षकांनी त्यांना मज्जाव केला असता ते तिघेही थिएटरमधून बाहेर गेले.

पण काही मिनिटांनी कोणीतरी आपल्या कमरेला स्पर्श करत असल्याचं जाणवलं. गोंधळ घालणारा व्यक्तीच हे कृत्य करत असल्याचं लक्षात आल्यानंतर मी त्याच्या थोबाडीत लगावली आणि आरडाओरडा केला. तो दारुच्या नशेत होता. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मला धक्का देऊन त्याने पळ काढला. या सगळ्या प्रकारामुळे माझ्या मुलीला धक्का बसला.

यानंतर आम्ही मॉलच्या सुरक्षारक्षाकडे जाऊन संबंधित आरोपीची माहिती दिली. त्याला मॉलबाहेर गाडीची वाट पाहत असलेल्या आरोपीला सुरक्षारक्षकांनी पाहिलं. पण आम्हाला पाहिल्यानंतर तो मॉलच्या आत पळाला. मात्र दुसऱ्या मजल्यावर सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं."

"काशीमिरा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपी पोलिस कोठडीत असून चौकशी सुरु आहे," असं ठाणे शहरचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी सांगितलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV