श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी तिचे पती बोनी कपूर यांची काल (सोमवार) दुबई पोलिसांनी चौकशी केली.

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी

दुबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी तिचे पती बोनी कपूर यांची काल (सोमवार) दुबई पोलिसांनी चौकशी केली. काही वेळेच्या चौकशीनंतर बोनी कपूर यांना पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती मिळते आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूवेळी बोनी कपूर कुठं होते? याची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. शिवाय श्रीदेवीचे कॉल रेकॉर्ड्सची तपासणीही पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी?


यासोबत दुबईतील लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या कपूर कुटुंबीयांचीही चौकशी होणार असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, श्रीदेवीचं पार्थिव ताब्यात मिळवण्यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जात आहेत, असं भारतीय परराष्ट्रमंत्रालयाच्या दुबईतील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप


दुसरीकडे श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी काल आणखी एक नवी माहिती समोर आली. चक्कर आल्यानं श्रीदेवी बाथटबमध्ये पडली आणि बुडून तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात अपघाती बुडून मृत्यू असं नमूद करण्यात आलं आहे. तसंच श्रीदेवीच्या शरीरात दारुचे अंश आढळल्याचंही समोर आलं आहे.

श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले


त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी दुबई पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. त्यामुळे श्रीदेवीसोबत शेवटच्या क्षणी नेमकं कोण होतं. याचा सध्या तपास सुरु आहे. भाच्याच्या लग्नासाठी श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईत गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मुलगी खुशीही होती. मात्र, कार्यक्रम आटोपल्यानंतर ती भारतात निघून आली. बोनी कपूरही खुशीसोबत भारतात आले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा दुबईत गेले आणि त्याच रात्री श्रीदेवीचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!
श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर
'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा 

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन 

अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत 

नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये...

श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dubai police Interrogation Boney Kapoor in Sridevi’s death latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV