इशा देओल-भरत तख्तानीने 'नन्ही परी'चं नाव ठेवलं...

बाळाचं नाव आजी हेमा मालिनी, आजोबा धर्मेंद्र आणि तख्तानी कुटुंबाच्या पसंतीस उतरलं आहे. आठवड्याभरात मित्र आणि नातेवाईकांसोबत बाळाचं बारसं करण्यात येईल.

इशा देओल-भरत तख्तानीने 'नन्ही परी'चं नाव ठेवलं...

मुंबई : अभिनेत्री इशा देओलने सोमवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचं 'राध्या' असं नाव ठेवण्यात आलं आहे. इशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी हे नाव ठरवलं.

'राधा' पासून राध्या हे नाव तयार करण्यात आलं आहे. राध्याचा अर्थ 'जिची पूजा करावी अशी' होत असल्याचं इशाच्या टीमने सांगितलं. बाळाचं नाव आजी हेमा मालिनी, आजोबा धर्मेंद्र आणि तख्तानी कुटुंबाच्या पसंतीस उतरलं आहे. आठवड्याभरात मित्र आणि नातेवाईकांसोबत बाळाचं बारसं करण्यात येईल.

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे इशाने मुलीला जन्म दिला. चित्रपटसृष्टी, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे भारावल्याची प्रतिक्रिया इशा आणि भरत यांनी दिली. दोघांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

अभिनेत्री इशा देओलच्या घरी चिमुकलीचं आगमन


इशाला मुलगी झाली, तर तिला भरतनाट्यम शिकवेन, अशी इच्छा तिच्या जन्मापूर्वीच आजी हेमा मालिनी यांनी व्यक्त केली होती.

काही वर्ष डेटिंग केल्यानंतर फेब्रुवारी 2012 मध्ये इशा आणि बिझनेसमन भरत तख्तानी यांनी साखरपुडा केला. तर जून 2012 मध्ये ते दोघं विवाहबंधनात अडकले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात इशाने प्रेग्नंसीबाबत घोषणा केली होती.

इशा देओल 2015 पासून चित्रपटसृष्टीपासून दूरच राहिली आहे. 2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पूंछे’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इशाची भूमिका असलेले युवा, धूम, काल, दस, नो एन्ट्री यासारखे चित्रपट गाजले आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV