सनी लिऑनीसोबत जाहिरात करण्यासाठी ईशा गुप्ताची अट

या ब्रॅण्डसह सनी लिऑनी पहिल्यापासूनच जाहिरात करत होती. ईशा आणि सनी या दोघींनी जाहिरातीत काम करावं, अशी कंपनीची इच्छा होती.

सनी लिऑनीसोबत जाहिरात करण्यासाठी ईशा गुप्ताची अट

मुंबई : बॉलिवूडच्या दोन बोल्ड अभिनेत्री जाहिरातीत एकत्र दिसल्या तर काय होईल? इथे विषय सुरु आहे सनी लिऑनी आणि ईशा गुप्ताचा. दोघांना कंडोमच्या जाहिरातीसाठी साईन केलं जाणार होतं, पण ईशाच्या फीचा आकडा ऐकून ही जाहिरात बनवण्याचा इरादाच कंपनीने बासनात गुंडाळला.

एक कंडोम कंपनीने ईशा गुप्ताला आपल्या ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी विचारणा केली होती. या ब्रॅण्डसह सनी लिऑनी पहिल्यापासूनच जाहिरात करत होती. ईशा आणि सनी या दोघींनी जाहिरातीत काम करावं, अशी कंपनीची इच्छा होती.

याबाबत ईशा गुप्ताला विचारलं असता तिने या प्रोजेक्टमध्ये रस दाखवला. पण तिने ही जाहिरात करण्यासाठी सनी लिऑनीपेक्षा दुप्पट फीची मागणी केली. पण कंपनीसाठी हा करार फारच महागात पडला असता. मग काय ईशाच्या फीचा भलामोठा आकडा ऐकून कंपनीने तिला जाहिरातीमध्ये घेण्याचा विचार सोडला.

ईशा कायमच तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. 'बादशाहो'च्या प्रदर्शनादरम्यान तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे. या फोटोंमुळे ती अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.

कंपनीला ईशा गुप्ताच्या ह्याच बोल्ड इमेजचा जाहिरातीसाठी वापर करायचा होता. पण ईशासोबत डील करणं एवढं महाग असेल हे कंपनीला माहित नव्हतं ना.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Esha Gupta doubles her fees for a condom advertisement with Sunny Leone
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV