अजय देवगणच्या नावावर 200 कोटींचा गंडा

उत्तर प्रदेशमधील अलाहबादमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या नावावर अनेकांना 200 कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मिस जम्मू किताबाने गौरवण्या आलेल्या भोजपुरी अभिनेत्री अनारा गुप्ताचंही नाव समोर येत आहे.

अजय देवगणच्या नावावर 200 कोटींचा गंडा

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील अलाहबादमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या नावावर अनेकांना 200 कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मिस जम्मू किताबाने गौरवण्या आलेल्या भोजपुरी अभिनेत्री अनारा गुप्ताचंही नाव समोर येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री अनारा गुप्ता आणि तिच्या अलाहबादमधील एका सहकाऱ्याने बोगस फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरु करुन, अजय देवगणच्या सिनेमासाठी अनेकांकडून पैसे उकळले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पीडित व्यक्तींनी अनारा गुप्ता आणि बोगस सिनेदिग्दर्शक ओमप्रकाश यादव यांच्यासह एकूण पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरु आहे.

दरम्यान, अनारा गुप्ताचं नाव यापूर्वी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. अनाराला 2001 मध्ये मिस जम्मू किताबाने गौरवण्यात आल्यानंतर, तिचं नाव एका सेक्स सिडीप्रकणात आलं होतं. या प्रकरणी अनारा, तिची आई आणि तीन भावांना अटकही झाली होती.

पण सिडीची हैदराबादमधील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर सिडीतील मुलगी अनारा नसल्याचं समोर आलं. पण चंदीगडमधील अशाच एका प्रकरणात याउलट सत्य समोर आलं होतं.

अनारा गुप्ता ही एक भोजपुरी अभिनेत्री असून दक्षिण भारतातीलही काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 2001 मध्ये मिस जम्मू किताबाने गौरवल्यानंतर, 2004 मध्ये एका सेक्स सिडीमुळे तिचं नाव सर्वात पहिला चर्चेत आलं होतं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fake production house fraud on the name of ajay devgan is busted
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV