फरहानकडून हृतिकची पाठराखण, कंगनाला फटकारलं

सात वर्षांचं प्रेम प्रकरण असल्याचा दावा तिने केला. त्याने तिचे आरोप फेटाळून लावले, इतकंच नाही तर स्वतःचा लॅपटॉप, ईमेल आयडीही तपासासाठी दिला, मग तिने सहकार्य का नाही केलं?' असा सवालही फरहानने उपस्थित केला आहे.

By: | Last Updated: > Sunday, 8 October 2017 8:17 PM
Farhan Akhtar writes facebook post on Hrithik Roshan Kangana Ranaut spat latest update

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि क्वीन अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादात आता अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने उडी घेतली आहे. हृतिकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत फरहानने त्याची पाठराखण केली आहे, तर कंगनाला ‘लक्ष्य’ केलं आहे.

फेसबुकवर लिहिलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये हृतिक-कंगनाचं नाव न घेता फरहानने निशाणा साधला आहे.
‘कोण बरोबर कोण चूक, हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. सायबर क्षेत्रातील जाणकार हे प्रकरण तडीस नेतलीच. पण तो पुरुष आणि ती स्त्री या दोघांना मी व्यावसायिकदृष्ट्या चांगलंच ओळखतो.’ असं फरहानने पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे.

अखेर हृतिकने मौन सोडलं, कंगनाच्या आरोपांवर फेसबुक पोस्ट

‘आपल्या समाजात अनेकदा महिलांना अत्याचाराचा सामना करावा लागतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही वेळा पीडितेलाच यासाठी जबाबदार ठरवलं जातं. बहुतांश वेळा महिलाच अन्यायाला बळी पडतात, मात्र प्रत्येक आणि बहुतांश या शब्दांमध्ये फरक आहे’ हे फरहानने अधोरेखित केलं आहे.

हृतिकने मला दुसरं मरणं दिलं, त्याने माफी मागावी : कंगना

‘फार कमी प्रकरणांमध्ये का असेना, पुरुषांवर पाळत ठेवली जाते, छळ केला जातो आणि खोटे आरोप केले जातात. काही जणांनी दुसरी बाजू ऐकून न घेताच महिलेची बाजू उचलून धरली. सात वर्षांचं प्रेम प्रकरण असल्याचा दावा तिने केला. त्याने तिचे आरोप फेटाळून लावले, इतकंच नाही तर स्वतःचा लॅपटॉप, ईमेल आयडीही तपासासाठी दिला, मग तिने सहकार्य का नाही केलं?’ असा सवालही फरहानने उपस्थित केला आहे.

कंगनाच्या आरोपांनंतर सुझानचं हृतिकच्या समर्थनार्थ ट्वीट

‘तिच्याकडे दोघांच्या सात वर्षांच्या रिलेशनशीपचा एकही पुरावा नाही. साधा फोटोही नाही. पॅरिसमध्ये साखरपुडा झाल्याचा दावा ती करते, पण त्या काळात तो फ्रान्सला गेल्याचा स्टॅम्प पासपोर्टवर का नाही? महिलेची बाजू डोळेझाकपणे स्वीकारली जाते’ असं फरहानने म्हटलं आहे. सत्य काहीही असो स्त्री-पुरुष यांची बाजू घेताना भेदाभेद नको, असं फरहानने म्हटलं आहे.

फरहानची फेसबुक पोस्ट :

‘आप की अदालत’मध्ये कंगनाने हृतिकवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर रोशन पिता-पुत्रांनी मौन बाळगलं, मात्र हृतिकने अखेर आपली बाजू मांडून ‘माझं मौन म्हणजे माझी दुर्बलता नाही’ असं प्रत्युत्तर दिलं होतं.

कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Farhan Akhtar writes facebook post on Hrithik Roshan Kangana Ranaut spat latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार
काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार

मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या मुलाची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश
दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीनं दिवाळीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक

ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप
ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप

मुंबई : ट्विटरवर बॉम्ब फोडणारा अभिनेता कमाल खानलाच ट्विटरने दिवाळी

'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर
'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा
'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी