'न्यूड' सिनेमासाठीचा संघर्ष संपला नाही, आता सुरु झालाय : रवी जाधव

सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावर बोलताना रवी जाधव म्हणाले, "सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे काहीही दाखवू शकत नाही. काही भान ठेवलं पाहिजे. अमर्याद स्वातंत्र्य घातक आहे. मग तुम्ही काहीही दाखवाल, हे योग्य नाही. त्यामुळे सिनेमा मेकिंगची सिस्टमच बदलून जाईल."

'न्यूड' सिनेमासाठीचा संघर्ष संपला नाही, आता सुरु झालाय : रवी जाधव

मुंबई : न्यूड सिनेमासाठीचा संघर्ष संपला नाही. किंबहुना संघर्ष सुरुच राहील. कारण सिनेमा लोकांसमोर आणण्यापर्यंत संघर्ष सुरु राहील, असे सिनेदिग्दर्शक रवी जाधव म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात रवी जाधव यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. वादात अडकलेल्या 'न्यूड' सिनेमासोबतच अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.

राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही :  रवी जाधव   

"अखिल भारतीय चित्रपट महामंडळ वगळता, कुठल्याही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला नाही. मराठी, मराठी करणाऱ्यांपैकीही कुणी नाही. अनेकांच्या पाठिंब्यांची अपेक्षा होती, पण नाही मिळाला. कुणीही कॉल केला नाही.", अशी खंत रवी जाधव यांनी व्यक्त केली. मात्र, "माझ्या मित्रांनी मला फोन करुन विचारलं, काही मदत लागली तर सांग. किंवा अनेकांनी पाठिंबा दिला. अर्थात इंडस्ट्रीमधीलही खूप कमी लोक पुढे आले.", असे सांगायलाही रवी जाधव विसरले नाहीत.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावर बोलताना रवी जाधव म्हणाले, "सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे काहीही दाखवू शकत नाही. काही भान ठेवलं पाहिजे. अमर्याद स्वातंत्र्य घातक आहे. मग तुम्ही काहीही दाखवाल, हे योग्य नाही. त्यामुळे सिनेमा मेकिंगची सिस्टमच बदलून जाईल."

न्यूड सिनेमाच्या पुढील वाटचालीबाबत रवी जाधव म्हणाले, " कालच सेन्सॉर बोर्डासोबत बैठक झाली. ते अडथळे आणत आहेत, असं वाटत नाही. ते सकारात्मक आहेत. मात्र जर खरंच वेळ काढूपणा करतायेत, असं वाटेल, तेव्हा तेव्हा सर्वांना पाठिंब्यासाठी आवाहन करेन."

'न्यूड' सिनेमाला नाकारलं का, याची कारणंच समजू शकले नाहीत, असे रवी जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले, "एकही कॉल आला नाही मिनिस्ट्रीकडून किंवा ज्युरीकडून आला नाही. सिनेमा वगळण्यात आल्याची माहिती मीडियाकडून कळत होती. सिनेमा रिजेक्ट का केला गेला, हेच माहित नाही. हे मी शोधतोय"

त्याचबरोबर, "न्यूड या नावामुळे सिनेमा वगळण्यात आल्याचं कारण मिळालं. सेन्सॉर करुन नाव घेतला होता. मग कळलं, सेन्सॉर सर्टिफिकेट नव्हतं. मुळात गेल्या दोन वर्षांपासून कायदा आहे, भारतीय सिनेमांना इफ्फीत सेन्सॉर सर्टिफिकेट लागतच नाही. सेन्सॉर हवा असल्यास ऑफिशियल मेल येतो. यावेळी तसं काहीच झालं नाही. मग सुरुवातीला विचार केलेला, कोर्टात जाण्याचा. नंतर डोक्यात असं आलं की, ओपनिंग फिल्म होती. मग आता काही झालं तरी ओपनिंगचा सन्मान मिळणार नाही. मग मराठी बाणा म्हणा किंवा काहीही, मी कोर्टात वगैरे गेलो नाही."

पाहा संपूर्ण माझा कट्टा :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Film Director Ravi Jadhav on majha katta latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV