प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचं निधन

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचं आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास निधन झालं. ते प्रदीर्घ काळापासून आजारी होते.

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचं निधन

मुंबई : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी यांचं आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास निधन झालं. ते प्रदीर्घ काळापासून आजारी होते.

राम मुखर्जी यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी पार्ल्यातील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राम मुखर्जींनी हिंदीसोबतच अनेक बंगाली सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं.

राम मुखर्जींचा 1960 मधील हम हिंदुस्तानी, आणि 1964 मधील लीडर सारख्या सिनेमांची निर्मिती केली. लीडर हा सिनेमा ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. याशिवाय, त्यांनी राणी मुखर्जीसाठी तिच्या पहिल्या ‘राजा की आएगी बारात’ या सिनेमाची निर्मितीही राम मुखर्जी यांनी केली होती.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV