सलमान खानला जीवानिशी मारेन, बिष्णोईची धमकी

बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

सलमान खानला जीवानिशी मारेन, बिष्णोईची धमकी

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने ही धमकी दिली.

राजस्थानमधील जोधपूरमध्येच सलमान खानला संपवणार असल्याची धमकी बिष्णोईने दिली.

बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एका उद्योगपतीची हत्या केल्याच्या प्रकरणातील सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात बिष्णोईला आणण्यात आले होते. त्यावेळी बिष्णोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली.

धमकीमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं, तरी काळवीट शिकार प्रकरणाशी याचा संबंध जोडला जातो आहे.

दरम्यान, बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेत, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याची माहिती पोलासांनी दिली.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Gangster Bishnoi threatens to kill Actor Salman Khan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV