अभिनेत्री मेघना नायडूचं घर लुटणाऱ्या दाम्पत्याला बेड्या

गोव्यातील कलंगुट पोलिसांनी प्रिन्सराज चवीराज आणि शर्मिल दलाल यांना अटक केली आहे

अभिनेत्री मेघना नायडूचं घर लुटणाऱ्या दाम्पत्याला बेड्या

पणजी : 'हवस' चित्रपट आणि 'कलियोंका चमन' सारख्या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मेघना नायडूच्या घरात चोरी करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. मेघनाच्या गोव्यातील बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातील लहान-सहान गोष्टीही चोरुन पोबारा केला होता.

गोव्यातील कलंगुट पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. 32 वर्षीय प्रिन्सराज चवीराज आणि 32 वर्षीय शर्मिल दलाल यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मेघनाच्या घरातील केअरटेकर सुहासिनी राऊतला या दोघांनी सव्वा लाख रुपयांचा गंडा घातला होता. मुलांना नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्यांनी वेळोवेळी पैसे उकळले होते. राऊत यांनी 26 फेब्रुवारी रोजी पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.

अभिनेत्री मेघना नायडूची दाम्पत्याकडून गोव्यात लूट


मेघना नायडूने फेसबुकवरुन या प्रकाराची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या दाम्पत्याचा फोटोही तिने शेअर केला होता.

गोव्यातील कंडोलिम भागात मेघनाच्या मालकीचा बंगला आहे. आरोपींनी आपण मुंबईतील वरळीचे रहिवासी असून न्यूझीलंडमध्ये नोकरी करत असल्याचं सांगितलं होतं. बनावट आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देऊन त्यांनी घर भाड्यावर घेतलं होतं.

घरातील लहान-सहान गोष्टींपासून मौल्यवान वस्तू, इतकंच काय माझी अंतर्वस्त्र आणि सॉक्सही घेऊन एका रात्रीत ते पळाले, असं मेघनाने फेसबुकवर लिहिलं होतं. 'माझी आणि माझ्या केअरटेकर ल्यूईस यांची कपड्यांची बॅग, स्पीकर त्यांनी पळवला. माझ्या केअरटेकरला 85 हजारांचा तर आणखी एका महिलेला 40 हजारांचा गंडा घातला', असा दावाही मेघनाने केला होता.

काय होती पोस्ट?

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Goa Police arrested Mumbai couple for duping Actress Meghna Naidu and caretaker latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV