रिलीजपूर्वीच 'गोलमाल अगेन'चा विक्रम

या सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 20 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला आहे.

रिलीजपूर्वीच 'गोलमाल अगेन'चा विक्रम

मुंबई : गोलमाल सीरिजचा आगामी सिनेमा 'गोलमान अगेन' 20 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाने रिलीजपूर्वीच नवा विक्रम केला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 20 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला आहे.

या सिनेमाचा ट्रेंड वर्ल्डवाईड असून सोशल मीडियावर ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. या सिनेमात अजय देवगण, अरशद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, नील नीतिन मुकेश यांची मुख्य भूमिका आहे. तर तब्बू आणि परिणीती चोप्रा या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील.

'गोलमान अगेन' हा हॉरर-कॉमेडी सिनेमा आहे. गोलमान सीरिजच्या जुन्या सिनेमांमधील अनेक सीन्स या सिनेमात असण्याची शक्यता आहे. गोलमाल सीरिजचे यापूर्वीचे सिनेमे हिट ठरल्यानंतर आता प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

2006 साली 'गोलमाल : फन अनलिमिटेड' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर 2008 साली 'गोलमाल रिटर्न्स' हा सिनेमा आला, तर 2010 साली 'गोलमान 3' या सिनेमाने प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. आता रोहित शेट्टी सात वर्षांनंतर या सीरिजमधील पुढील सिनेमा घेऊन येत आहे.

सिनेमाचा टीझर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: golmal again गोलमाल अगेल
First Published:

Related Stories

LiveTV