'संघर्षयात्रा'च्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला!

By: | Last Updated: > Friday, 17 March 2017 9:27 PM
'संघर्षयात्रा'च्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला!

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बायोपिक ‘संघर्षयात्रा’ सिनेमाच्या रिलीजला अखेर मुहूर्त सापडला आहे. 14 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सिनेमाचे दिग्दर्शक साकार राऊत यांनी दिली.

काही तांत्रिक बाबींमुळे सिनेमाची घोषणा झाल्यानंतरही सिनेमा रिलीज करण्यासाठी वेळ लागला, असं साकार राऊत यांनी सांगितलं. या सिनेमात सुचवलेले काही बदल करण्यात आले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिल्याने प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असंही साकार राऊत म्हणाले.

sangharshyatra

अभिनेता शरद केळकर गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर श्रुती मराठेने पंकजा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. ओंकार कर्वे प्रमोद महाजन यांच्या तर, प्रवीण महाजन यांच्या भूमिकेत गिरीश परदेशी दिसणार आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू, त्यापूर्वी त्यांचे नातेवाईक प्रमोद महाजन यांचा मृत्यू, मुंडे यांचं वादळी राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य, यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सिनेमाचा टीझर :

संबंधित बातमी :  गोपीनाथ मुंडेंवरील ‘संघर्षयात्रा’ चित्रपटाला पंकजांचा विरोध

First Published:

Related Stories

रणवीर सिंह 'पद्मावती'च्या सेटवर जखमी
रणवीर सिंह 'पद्मावती'च्या सेटवर जखमी

मुंबई : बॉलिवूड सपरस्टार रणवीर सिंह पद्‍मावती सिनेमाच्या

'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई
'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन

... म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं!
... म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं!

मुंबई : सिनेमाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये

तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री
तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन

अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची केस
अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची केस

मुंबई : अभिनेता दीपक तिजोरीच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पत्नी

रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स
रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स

आपल्या भूतकाळाला जोडणारे, त्याच्याशी नातं सांगणारे खूप कमी

ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच
ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच

मुंबई : अभिनेता सलमान खानचा मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईटचा पहिला

शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन
शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन

नाशिक : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या क्रेझी फॅन्सची संख्या काही

विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट
विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट

मुंबई : अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली ललिता बन्सी अनेकांसाठी आशेचा

सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?
सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावरच्या ‘सचिन : ए