मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

राजपूत समाजाच्या भावना दुखावल्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी स्पष्ट केलं.

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर बंद घालण्यात आली आहे. राजपूत समाजाच्या भावना दुखावल्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी स्पष्ट केलं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्हाला विश्वास आहे. मात्र इतिहासाशी छेडछाड करणं कदापि सहन केलं जाणार नाही, असं विजय रुपनी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्येही या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट खडतर असणार आहे. शिवाय मध्य प्रदेशात हा सिनेमा रिलीज होणार नाही, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे.

‘पद्मावती’ला असलेल्या विरोधाने आता राजकीय स्वरुप घेतलं आहे. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही पद्मावती सिनेमाला विरोध असल्याचं बोलून दाखवलं आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.

सिनेमातील आक्षेपार्ह दृष्य हटवल्याशिवाय राज्यात सिनेमा प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी जयकुमार रावल यांनी केली. शिवाय सेन्सॉर बोर्डात इतिहासकारांचा समावेश असावा, असं पत्रही त्यांनी सेन्सॉर बोर्डाला पाठवलं आहे.

पद्मावती सिनेमाला अगोदर राजपूत करणी सेनेचा विरोध होता. मात्र आता या विरोधाला राजकीय स्वरुप प्राप्त झालं आहे. मध्य प्रदेशात सिनेमा रिलीज केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता राज्यातही सिनेमाविरोधी सूर दिसत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही सिनेमा रिलीज होऊ देऊ नये, अशी मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र तरीही संजय लीला भन्साळी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

संबंधित बातम्या :

संबंधित बातम्या :

मध्य प्रदेशात पद्मावती रिलीज होणार नाही : शिवराज सिंह


… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात


‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा


‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज


सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली


‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर


एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज


‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन


‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार


दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज


रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा


रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Govt of Gujarat will not allow Padmavati says cm vijay rupani
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV