बिग बी @75 : राज ठाकरेंकडून अमिताभ बच्चन यांना खास शुभेच्छा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. बिग बींच्या लाखो चाहत्यांकडून जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

बिग बी @75 : राज ठाकरेंकडून अमिताभ बच्चन यांना खास शुभेच्छा

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये त्यांना बिग बी, शहंशाह अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. वयाच्या 75 व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरणारा हा रुपेरी पडद्यावरचा अनभिषिक्त सम्राट आजही सिनेसृष्टीत तेवढाच सक्रिय आहे.

अमिताभ बच्चन बच्चन वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह मालदीवला गेले आहेत. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांच्यासह बच्चन कुटुंब मालदीवला गेलं आहे. बिग बींच्या लाखो चाहत्यांकडून जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही व्यंगचित्राच्या माध्यमातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 1970  ते 2017 या काळातील विविध टप्प्यावरील बिग बींचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी शेअर केले आहेत.सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV