बर्थ डे स्पेशल : बालपण, अफेअर आणि लग्न, रेखाचं जीवन

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील गेल्या 50 वर्षांच्या काळात ही अभिनेत्री विविध कारणांमुळे

By: | Last Updated: > Tuesday, 10 October 2017 3:48 PM
happy birthday rekha gossips of rekha’s life

मुंबई : भानुरेखा गणेशन अर्थात बॉलिवूडची चिरतरुण अभिनेत्री रेखाने आज वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. बॉलिवूड कारकीर्दीत वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींमध्ये रेखाचं नाव येतं.

बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची कायमच चर्चा असायची. मात्र 1990 साली रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला. पण लग्नाच्या एका वर्षाच्या आतच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं.

रेखाने अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी लग्न केल्याचंही बोललं जायचं. मात्र रेखाने या वृत्तांचं खंडण करत चर्चांना पूर्ण विराम दिला. पतीच्या निधनानंतरही सिंदूर लावल्याने रेखा नेहमी चर्चेत असायची.

वडिलांच्या अंत्यसंस्काराला रेखा गेली नाही

रेखा ही दाक्षिणात्य सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावली यांची मुलगी आहे. रेखाचा जन्म झाला तेव्हा जेमिनी गणेशन आणि पुष्पावली यांचा विवाह झाला नव्हता, असं बोललं जातं. रेखाचं बालपण संघर्षमय आहे. कारण जेमिनी गणेशन यांनी कधीही रेखाची पर्वा केली नाही, किंवा तिला स्वतःचं नावही दिलं नाही.

जेमिनी गणेशन यांनी चार लग्न केली. मात्र रेखाच्या आईशी म्हणजे पुष्पावलीशी कधीही लग्न केलं नाही. रेखाला वडिलांचा एवढा तिरस्कार होता की, ती त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही.

बॉलिवूडमधील अधुरं स्वप्न

रेखाने बॉलिवूड कारकीर्दीत अनेक भूमिकांना न्याय दिला. आर्थिक परिस्थितीने रेखाला तेलुगूतील ब आणि क श्रेणीतील सिनेमांमध्येही काम करण्यास भाग पाडलं. मात्र गेल्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रेखाचं एक स्वप्न अधुरं राहिलं. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याचं रेखाचं स्वप्न होतं.

 

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:happy birthday rekha gossips of rekha’s life
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी

करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके
करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

मुंबई : सोशल मीडियावर असंबद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेला

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन
शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं.

अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री

पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये

धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?
धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली
आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार

....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली
....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार