बर्थ डे स्पेशल : एका वर्षात 12 सिनेमे, अक्षय कुमार खिलाडी कसा बनला?

अक्षय कमारने करिअरची सुरुवात सौगंध या सिनेमातून केली. मात्र त्याची खरी ओळख खिलाडी या सिनेमातून निर्माण झाली. अक्षय कुमारचे गेल्या अनेक वर्षांपासून किमान चार तरी सिनेमे एका वर्षात रिलीज होतात.

By: | Last Updated: > Saturday, 9 September 2017 8:52 AM
here’s how akshay kumar becomes khiladi of Bollywood

मुंबई : वयाच्या 50 व्या वर्षी निवृत्तीचा विचार केला जातो किंवा नियमित कामातून स्वतःला आराम देण्याचा प्रयत्न असतो. मात्र जे काम एखादा व्यक्ती वयाच्या 20 व्या वर्षी करायचा, तेच काम वयाच्या 50 व्या वर्षी केलेलं तुम्ही पाहिलं नसेल. स्वाभाविकपणे वयानुसार व्यक्ती बदलतो. मात्र याला एक अपवादही आहे. त्याचं नाव आहे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार. तो ना कधी थकलाय, ना कधी थांबलाय. वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक आयुष्य आणि सामाजिक भान अशा सर्वच जबाबदाऱ्या पार पाडत हा अभिनेता वयाच्या 50 व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने काम करतो, जेवढा तो सुरुवातीच्या काळात करायचा.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने वयाचे 50 वर्ष पूर्ण केले आहेत. एका वर्षात चार पेक्षा अधिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणारा हा एकमेव अभिनेता तुम्ही पाहिला असेल. मात्र चार पाच नव्हे, तर तब्बल बारा सिनेमे एका वर्षात करण्याचा विक्रम अक्षय कुमारने केलेला आहे.

एका वर्षात 12 सिनेमे

अक्षय कमारने करिअरची सुरुवात सौगंध या सिनेमातून केली. मात्र त्याची खरी ओळख खिलाडी या सिनेमातून निर्माण झाली. अक्षय कुमारचे गेल्या अनेक वर्षांपासून किमान चार तरी सिनेमे एका वर्षात रिलीज होतात. मात्र हा खिलाडी एका वर्षात बारा सिनेमे करायचा यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.

अक्षय कुमारने 1994 साली तब्बल बारा सिनेमे केले होते. ऐलान हा 1994 मधील त्याचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ये दिल्लगी, जय किशन, मोहरा, मै खिलाडी, तू अनाडी, इक्के पे इक्का, अमानत, सुहाग, नजर के सामने, जख्मी दिल, जालीम, हम है बेमिसाल आणि पांडव अशी बारा सिनेमे या वर्षात रिलीज झाले होते.

अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी कसा बनला?

अक्षय कुमारने ज्या पद्धतीने यश मिळवलं, तसंच त्याला करिअरमध्ये अनेक चढऊतारही सहन करावे लागले. कधी अॅक्शन, कधी कॉमेडी, तर कधी खिलाडी या अशा भूमिकांमधून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. अक्षय कमारने करिअरची सुरुवात सौगंध या सिनेमातून केली. मात्र त्याची खरी ओळख खिलाडी या सिनेमातून निर्माण झाली.

5 जून 1992 रोजी खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. दीपक तिजोरी या सिनेमात अक्षय कुमारसोबत सहकलाकार म्हणून होता. नव्वदच्या दशकात अक्षय कुमारने अनेक सिनेमे केले. मात्र खिलाडी या टायटलचे सिनेमे प्रक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. 1994 साली अक्षय कुमारचे बारा सिनेमे रिलीज झाले. मात्र यामध्ये ‘मै खिलाडी, तू अनाडी’ हा सिनेमा सर्वाधिक यशस्वी ठरला. तेव्हापासूनच खिलाडी हा टॅग अक्षय कुमारच्या नावासमोर लागला आणि निर्मात्यांमध्येही याच टॅगसह सिनेमे करण्यासाठी चढाओढ सुरु झाली.

1995 साली सबसे बडा खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवलं. त्यानंतर खिलाडी या टायटलचा सिनेमा हमखास यश मिळवतोच अशी धारणा झाली. त्यानंतर 1996 साली अक्षय कुमारचा खिलाडीयो का खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. अभिनेत्री रेखा आणि रवीना टंडन या सिनेमात मुख्य भूमिकेत होत्या. रेखा आणि अक्षय कुमार यांच्यातील बोल्ड दृष्यांनी त्या काळी खळबळ माजवली. याच सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमीही झाला होता. त्याच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले.

बॉक्स ऑफिसवर खिलाडीयो का खिलाडी यशस्वी झाल्यानंतर 1997 साली मिस्टर अँड मिसेस खिलाडी हा सिनेमा आला. ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जुही चावला मुख्य भूमिकेत होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करु शकला नाही. तरीही निर्मात्यांचा खिलाडी या टॅगवरील विश्वास कमी झाला नाही.

दिग्दर्शक उमेश मेहरा यांनी 1999 साली अक्षय कुमारला इंटरनॅशनल खिलाडी बनवून पडद्यावर आणलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. ट्विंटकल खन्ना या सिनेमात अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत होती. यानंतर 2000 साली अक्षय कुमारचा खिलाडी 420 हा सिनेमा रिलीज झाला. ज्यामध्ये त्याच्या अॅक्शन स्टंटचं जोरदार कौतुक करण्यात आलं.

‘खिलाडी 420’ नंतर अक्षय कुमारच्या खिलाडी सीरिजने जवळपास 12 वर्षांसाठी ब्रेक घेतला. 2012 साली खिलाडी 786 हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. 2012 साली खिलाडी सीरिजने 20 वर्षही पूर्ण केले. अक्षय कुमारच्या करिअरमध्ये खिलाडी सीरिजचं योगदान सर्वात मोठं आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:here’s how akshay kumar becomes khiladi of Bollywood
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही