वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ची वीकेंडपर्यंत किती कमाई?

‘ऑक्टोबर’ हा जुही चतुर्वेदी यांनी लिहिलेला रोमँटिक ड्रामा आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा बनवला गेला आहे.

वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ची वीकेंडपर्यंत किती कमाई?

मुंबई : अभिनेता वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ सिनेमाने गेल्या तीन दिवसात कमाईत वेग पकडला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी म्हणावी तशी ओपनिंग मिळाली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी कमाईने वेग घेतला. गेल्या तीन दिवसात 20 कोटी 25 लाखांचा गल्ला जमला आहे.

शूजित सरकारने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. समीक्षकांनीही सिनेमाला चांगले रेटिंग्ज दिले आहेत. तसेच, प्रेक्षकांमधूनही सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

13 एप्रिलला ‘ऑक्टोबर’ सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी 5.04 कोटी, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 7.47 कोटी, तर रविवारी 7.74 कोटी रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला. म्हणजेच आतापर्यंत 20.25 कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे.जुही चतुर्वेदी यांनी लिहिलेला हा रोमँटिक ड्रामा आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा बनवला गेला आहे.

जगभरातील 2 हजार 308 स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतातील 1683, तर परदेशातील 625 स्क्रीन्सचा समावेश आहे.

पाहा ट्रेलर -

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: how many weekend collection of October film?
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV