... म्हणून अभिनेता हृतिक रोशन राजस्थानच्या रस्त्यांवर पापड विकतोय!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या ‘सुपर 30’ या अपकमिंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

... म्हणून अभिनेता हृतिक रोशन राजस्थानच्या रस्त्यांवर पापड विकतोय!

जयपूर : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या ‘सुपर 30’ या अपकमिंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच सिनेमातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. या फोटोमधून तो राजस्थानच्या रस्त्यांवर पापड विकताना दिसत आहे.

हृतिक रोशन हा बॉलिवूडचा सर्वात हॅण्डसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण सध्या तो आपल्या आगामी ‘सुपर 30’ सिनेमासाठी कठोर परिश्रम घेत आहे. या सिनेमात कॉमनमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या याच सिनेमाचं शूटिंग राजस्थानच्या संबल गावात सुरु असून, यात तो संबलच्या रस्त्यावर पापड विकताना दिसत आहे.

हृतिकने आजपर्यंत अनेक भूमिक वठवल्या आहेत. पण पहिल्यांदाच तो सर्वसामान्याच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे. हा सिनेमा गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे.

या सिनेमात मृणाल ठाकूर ही हृतिकच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहे. हा सिनेमा 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

कोण आहेत आनंद कुमार?

आनंद कुमार बिहारमध्ये 'सुपर-30' या नावाने ते चालवितात. या उपक्रमाअंतर्गत गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवतात.

यासाठी त्यांनी 'रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स' ही संस्था सुरु केली. या संस्थेकडून मुलांची चाचणी घेऊन त्यातून 30 जणांची निवड केली जाते. यानंतर त्यांना आयआयटी प्रवेश व इतर अनेक परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जातं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: hrithik roshan shooting photo from upcomming film super-30 goes viral
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV