अखेर हृतिकने मौन सोडलं, कंगनाच्या आरोपांवर फेसबुक पोस्ट

काही दिवसांपूर्वीच कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत हृतिकवर बरेच आरोप केले होते. मात्र हृतिकने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगलं होतं.

अखेर हृतिकने मौन सोडलं, कंगनाच्या आरोपांवर फेसबुक पोस्ट

मुंबई : कंगना राणावत आणि हृतिक रोशनमधला वाद गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या या लढाईत कंगना वरचढ ठरत असतानाच, हृतिकने ट्विटर आणि फेसबुकवरुन कंगनाला सडेतोड उत्तर दिलं आहे.

"ज्या नात्याबद्दल कंगना खुलेआम चर्चा करतेय, ते नातं कधीही अस्तित्वात नव्हतं," असा दावा हृतिकने केला आहे.

हृतिकने मला दुसरं मरणं दिलं, त्याने माफी मागावी : कंगना

कंगनाला उद्देशून हृतिकने फेसबुक आणि ट्विटरवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात हृतिक म्हणतो,

"मी नेहमी माझ्या मार्गाने चालत आलोय आणि टीकांकडे नेहमी दुर्लक्ष केलंय. शांत बसणं आणि दुर्लक्ष करणं याचा अर्थ हे सर्व आरोप मला मान्य आहेत, असा होत नाही. मी कंगनाला एकांतात कधीही भेटलो नाही. कामाच्या निमित्ताने आमच्या भेटीगाठी व्हायच्या. पण ज्या नात्याबद्दल कंगना बोलतेय असं नातं आमच्यात कधीच नव्हतं. गेल्या चार वर्षांपासून कंगनाचा मनस्ताप मी सहन करतोय. कंगनाने खोटा दावा करत मी तिला पॅरिसमध्ये प्रपोज केल्याचंही म्हटलंय, पण माझ्या पासपोर्टची चाचणी करण्यात आलीय, ज्यात मी पॅरिसला गेलो नसल्याचं सिद्ध झालंय."


कंगनाच्या आरोपांनंतर सुझानचं हृतिकच्या समर्थनार्थ ट्वीट

काही दिवसांपूर्वीच कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत हृतिकवर बरेच आरोप केले होते. मात्र हृतिकने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगलं होतं. वकिलांच्या सांगण्यावरुनच हृतिकने मौन पाळल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता हृतिकने ट्विटरवर व्यक्त होत नव्या वादाला हवा दिली आहे.

संबंधित बातम्या

श्रेयसनंतर कंगनाच्या बहिणीनेही केआरकेला शिव्या...

कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV