'अनौरस अपत्य' असल्याचा मला अभिमान, मसाबाचं ट्रोलर्सना उत्तर

अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

'अनौरस अपत्य' असल्याचा मला अभिमान, मसाबाचं ट्रोलर्सना उत्तर

मुंबई : सोशल मीडियावर दररोज एखादा सेलिब्रिटी ट्रोल होतच असतो. आता बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती. परंतु अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

अनौरस संतती संबोधून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना मसाबा म्हणाली की, "मला याचा अभिमान आहे."

काय आहे प्रकरण?
सर्वोच्च न्यायालयाने फटक्यांवर घाललेल्या बंदीचं फॅशन डिझायनर मसाबाने स्वागत केलं होतं. फटाकेबंदीच्या समर्थनार्थ ट्वीट तिने केलं होतं. पण या ट्वीटनंतर ट्रोलर्स तिच्या हात धुवून मागे लागले. यानंतर मसाबाने खुलं पत्र ट्वीट करुन ट्रोलर्सना चोख उत्तर दिलं.

https://twitter.com/MasabaG/status/918325963171151873

मसाबा लिहिते, "मला अनौरस अपत्य  आणि अनौरस वेस्ट इंडियन म्हटलं. पण हे ऐकून मला फारच अभिमान वाटला. दोन वैध व्यक्तींचं मी अनौरस अपत्य आहे. मी वैयक्तिक आणि व्यायसायिकदृष्ट्या माझं आयुष्य शानदार बनवलं आहे. मला त्याचा गर्व आहे.

10 वर्षांची असल्यापासून मला अशा नावांनी संबोधलं जातं. तेव्हापासून हे शब्द माझ्या रक्तात भिनले आहेत.

माझी वैधता माझ्या कामामुळे आणि समाजाप्रती असेलल्या योगदानातून येते. प्रयत्न करा पण तुम्ही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही.

मला ह्या नावांनी संबोधून तुम्हाला आनंद मिळणार असेल तर खुशाल बोला. इंडो-कॅरेबियन मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही आणि समाज ज्या गोष्टी सांभाळू शकत नाही, त्यासमोर लाजेने झुकणं काय असतं हे मला माहित नाही. हे माझ्या 'अनौरस' जीन्समध्येच आहे."

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV