पुन्हा बोल्ड सीन करणार नाही : डेजी शाह

मला ही इमेज तोडायची होती, म्हणून मी हेट स्टोरी 3 हा चित्रपट केला," असं तिने सांगितलं.

पुन्हा बोल्ड सीन करणार नाही : डेजी शाह

मुंबई : सलमान खानच्या 'जय हो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या डेजी शाहने 'हेड स्टोरी 3' मध्ये अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. तिला या भूमिकेत पाहून चाहत्यांनाही धक्का बसला होता. पण आता डेजीला तिची इमेज बदलायची आहे.

"हेट स्टोरी 3 मध्ये डेजीने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. पण तिला आता असे सीन करण्याची इच्छा नाही. 'आता मी पुन्हा कधीही बोल्ड आणि इंटिमेट सीन करणार नाही. मी केवळ सामान्य मुलीची व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने साकारु शकते असं लोकांना वाटत होतं. मला ही इमेज तोडायची होती, म्हणून मी हेट स्टोरी 3 हा चित्रपट केला," असं तिने सांगितलं.

'रेस 3' मध्ये काम करण्याच्या वृत्ताबाबत डेजी शाह म्हणाला की, "मी चित्रपट साईन केलेला नाही, फक्त तोंडी बातचीत झाली आहे. सिनेमात काम करतेय की नाही यावर मी सध्या काहीही बोलणार नाही. ते अयोग्य असेल. निर्मातेच याची घोषणा करतील."

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV