...तर केआरकेला घरात जाऊन मारलं असतं : श्रेयस तळपदे

बाकीच्यांसोबत तू काही शहाणपणा करतोयस तो तुझा आणि त्यांचा लुकआऊट आहे. माझ्यासोबत अशा पद्धतीचा शहाणपणा करु नको. तो मेसेज त्याला लाऊड अँड क्लिअर पोहोचला असेल.

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 1:29 PM
I would have beat KRK in his house : Shreyas Talpade

मुंबई : वादग्रस्त ट्वीट्समुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कमाल आर खानला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज होती. त्याने पुन्हा शिवीगाळ केली असती, तर त्याला घरात जाऊन मारलं असतं, अशी प्रतिक्रिया अभिनेता श्रेयस तळपदेंने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कमाल खानने श्रेयस तळपदे दिग्दर्शित आणि सनी देओल-बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘पोस्टर बॉईज’ सिनेमाविषयी बोलताना या टीका केली होती. कमाल खानने सवयीप्रमाणे खालच्या पातळीवर जात आक्षेपार्ह शब्दही वापरला होता.

कमाल खान औकातीत राहा, ‘त्या’ ट्वीटनंतर श्रेयस तळपदेची सटकली!

त्यानंतर श्रेयसही गप्प बसला नाही. “औकात में रह कमाल खान @#%$. कभी हाथ लगा तो इतनी जोर से पटकूंगा की टप्पा खा के छत से लगेगा. जय महाराष्ट्र,” असं उत्तर श्रेयसने दिलं होतं.

केआरके सोबतच्या ट्विटर वॉरबद्दल एबीपी माझाशी बोलताना श्रेयस म्हणाला की, “अशा लोकांना उत्तर द्यायलाच पाहिजे आणि त्यांच्या भाषेतच द्यायला पाहिजे. म्हणून मीही त्याच भाषेत उत्तर दिलं. जाऊ दे, हे लोक असंच बोलतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या ह्या अॅटिट्यूडमुळे ही माणसं शेफारतात. त्याला मेसेज जाणं गरजेचं होतं. बाकीच्यांसोबत तू काही शहाणपणा करतोयस तो तुझा आणि त्यांचा लुकआऊट आहे. माझ्यासोबत अशा पद्धतीचा शहाणपणा करु नको. तो मेसेज त्याला लाऊड अँड क्लिअर पोहोचला असेल. अनेकांनी माझ्या उत्तराला चांगला प्रतिसाद दिला.

मी त्याच्या पातळीवर उतरुन त्याला उत्तर दिलं. त्याला यापेक्षा जास्त महत्त्व देण्याची किंवा बोलायची गरज नाही. त्याला योग्य ठिकाणी आणि योग्य तो लाफा मिळाला होता. नंतर मी त्याला ब्लॉक केलं. मग तो मला काय बोलला हे मला माहित नाही. नंतर तो फक्त सिनेमाबद्दल बोलला असं मला मित्रांकडून कळलं. पण शिवीगाळ केली नव्हती. ती केली असती तर मी घरात जाऊन मारलं असतं त्याला.”

पाहा व्हिडीओ

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:I would have beat KRK in his house : Shreyas Talpade
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही