'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!

यंदाच्या ‘इफ्फी’तून न्यू़ड सिनेमा वगळल्यानंतर एकच वाद निर्माण झाला होता.

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ सिनेमाला वगळल्याच्या निषेधार्थ, आवाज उठवला जातो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मराठी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार कोणीच साधा निषेधही नोंदवला नाही.

यंदाच्या ‘इफ्फी’तून न्यू़ड सिनेमा वगळल्यानंतर एकच वाद निर्माण झाला होता. ‘इफ्फी’त निवड झालेल्या इतर सिनेमाच्या निर्मात्यांनी एकत्र येऊन या चित्रपट महोत्सवावर बहिष्कार घालावा असाही सूर उमटला.

मात्र त्या निर्मात्यांची तयारी नव्हती. त्याऐवजी इफ्फीत आम्ही जगाभरातल्या लोकांसमोर निषेध करु असा गाजावाजा केला गेला.

या महोत्सवात आज संध्याकाळी पाच वाजता रवी जाधवची मुख्य भूमिका असलेला ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा दाखवला गेला. या चित्रपटावेळी स्क्रिनिंगवेळी न्यूडबाबत  निषेध व्यक्त केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसं काही न होता हे स्क्रिनिंग सुरळीत सुरु असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: iffi goa 2017 dates : no one raised voice against nude
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV