शाहरुखचा अलिबागमधील बंगला आयकर विभागाकडून सील

शेतकरी असल्याचा बनाव करुन शाहरुख आणि गौरी खान यांनी अलिबागमध्ये जमिन खरेदी केली आणि त्यावर आलिशान बंगला बांधला, असा आरोप होता.

शाहरुखचा अलिबागमधील बंगला आयकर विभागाकडून सील

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या अलिबागमधील फार्महाऊसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेला 'देजाऊ' हा बंगला आयकर विभागानं सील केला आहे. बेहिशेबी संपत्ती प्रकरणातून ही कारवाई केल्याची माहिती आहे.

शेतकरी असल्याचा बनाव करुन शाहरुख आणि गौरी खान यांनी अलिबागमध्ये जमिन खरेदी केली आणि त्यावर आलिशान बंगला बांधला, असा आरोप काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.

शेतकरी असल्याचं सांगून शाहरुख-गौरीकडून फसवणूक?


राजाराम आजगावकर यांचा मूळ बंगला असून तो शाहरुख खानच्या नावामुळे प्रसिद्ध झाला. 2006 मध्ये हा बंगला सुमारे 4 एकर जागेत बांधण्यात आला. यामध्ये तळ मजल्यासोबत दोन मजले उभारण्यात आले आहेत. मात्र आजगावकर यांनी सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केली असल्याची तक्रार करण्यात आली होती.

बंगल्यात वैयक्तिक हेलिपॅड आणि स्वीमिंग पूलही आहे. शाहरुखने याच बंगल्यात आपला वाढदिवस साजरा केला होता. या परिसरात अनेक दिग्गज उद्योगपती आणि कलाकारांच्या जमिनी असून त्यांनीही सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Income Tax department seals Shah rukh Khan’s bungalow in Alibaug latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV