आणीबाणीवर आधारित 'इंदू सरकार'चा ट्रेलर रिलीज

आणीबाणीवर आधारित 'इंदू सरकार'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.

अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश, मधुर भांडारकर यांच्या उपस्थितीत मुंबईत या सिनेमाचा ट्रेलरचा लाँचिंग सोहळा पार पडला. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.

पाहा सिनेमाचा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV