हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?

चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात हिंदी सैराटचं शूटिंग सुरु होणार आहे.

हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?

मुंबई : हिंदी सैराटचं कास्टिंग झालं असून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने अनेक विक्रम मोडित काढले. सैराटच्या यशाने फक्त मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे अधिकृत हक्क विकत घेतले असून लवकरच तो सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

मराठी सैराटमध्ये रिंकू राजगुरुने साकारलेली आर्ची प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली होती. तिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही मोहर उमटवली होती. तर आकाश ठोसरने परशाची व्यक्तिरेखा गाजवली होती.

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात हिंदी सैराटचं शूटिंग सुरु होणार आहे. हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स'मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.

श्रीदेवीची मुलगी हिंदी 'सैराट'मध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?


जान्हवी बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास उत्सुक आहे. करण जोहरने तिला काही महिन्यांपूर्वी साईन केलं होतं. त्यावेळी करणने सैराटचे हक्क विकत घेतले होते. मात्र जान्हवीला सैराट सिनेमात रोल ऑफर केला आहे, की दुसऱ्या सिनेमाची जुळवाजुळव सुरु आहे, हे तेव्हा स्पष्ट करण्यात आलं नव्हतं.

https://twitter.com/rameshlaus/status/927347652794105856

दुसरीकडे, सैफ अली खानची मुलगी सारा अभिषेक कपूरच्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात सिल्व्हर स्क्रीनवर स्टारकिड्सची टक्कर पाहायला मिळेल.

एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. तर अनेक पुरस्कारही खिशात घातले.

संबंधित बातम्या


PHOTO - श्रीदेवीची मुलगी हिंदी सैराटमध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?


रोमँटिक सिनेमांचा बादशाह करण जोहर 'सैराट' हिंदीत आणणार?

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Jhanvi Kapoor to make Bollywood Debut In Sairat With Ishaan Khattar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV