श्रीदेवीसारखंच जान्हवीलाही चाहत्यांचं प्रेम मिळेल : बोनी कपूर

'वडील म्हणून मी तिला आशीर्वाद देतो. ती खूप मेहनती आहे. मला विश्वास आहे की, तिच्या आईप्रमाणेच तिलाही लोकांचं प्रेम मिळेल.' असं बोनी कपूर यावेळी म्हणाले.

श्रीदेवीसारखंच जान्हवीलाही चाहत्यांचं प्रेम मिळेल : बोनी कपूर

मुंबई : 'श्रीदेवीला ज्याप्रमाणे चाहत्यांचं प्रेम मिळालं तसंच प्रेम माझी मुलगी जान्हवीला देखील मिळेल.' अशी प्रतिक्रिया निर्माते बोनी कपूर यांनी दिली. जान्हवी बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याबाबत बोलताना बोनी कपूर म्हणाले की, 'वडील म्हणून मी तिला आशीर्वाद देतो. ती खूप मेहनती आहे. मला विश्वास आहे की, तिच्या आईप्रमाणेच तिलाही लोकांचं प्रेम मिळेल.' असं बोनी कपूर यावेळी म्हणाले.

हेमामालिनी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

'मला आशा आहे की, ती सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल.' असंही बोनी कपूर यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी 'मॉम' सिनेमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं.

'एक चांगला सिनेमा बनवला आणि त्याला यश मिळालं तर कुणाही निर्मात्याला आनंदच होतो. 'मॉम' सिनेमाच्या माध्यमातून आणि नवे दिग्दर्शक आणि लेखकांनाही लाँच केलं.' असं बोनी कपूर यावेळी म्हणाले.

'मॉम' सिनेमात श्रीदेवीनं शानदार काम केल्यानं आम्ही हा सिनेमा वर्ल्डवाइड रिलीज केला. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. असं म्हणत बोनी कपूर यांनी 'मॉम' सिनेमाबद्दल समाधान व्यक्त केलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV