'फिल्मफेअर'च्या ब्लॅक लेडीला विद्या-इरफानची भुरळ

'तुम्हारी सुलू' चित्रपटात साध्या-सुध्या गृहिणीची आरजे झालेल्या सुलोचनाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला. विद्याचा हा कारकीर्दीतला सहावा फिल्मफेअर आहे.

'फिल्मफेअर'च्या ब्लॅक लेडीला विद्या-इरफानची भुरळ

मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 63 व्या जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स 2018 मध्ये 'हिंदी मीडियम'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तर इरफान खान आणि विद्या बालन यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी फिल्मफेअरची 'ब्लॅक लेडी' पटकावली.

फिल्मफेअरच्या झगमगत्या सोहळ्याचं सूत्रसंचालन किंग खान शाहरुख आणि फिल्ममेकर करण जोहर यांनी केलं. मुंबईतील वरळीमध्ये शनिवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला.

'हिंदी मीडियम'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला, तर याच चित्रपटातील भूमिकेसाठी इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अश्विनी अय्यरला 'बरेली की बर्फी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला.

विद्याला सहावा फिल्मफेअर

'तुम्हारी सुलू' चित्रपटात साध्या-सुध्या गृहिणीची आरजे झालेल्या सुलोचनाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला. विद्याचा हा कारकीर्दीतला सहावा फिल्मफेअर आहे. परीणिता चित्रपटासाठी पदार्पणाच्या पुरस्कारानंतर पा, इष्किया (क्रिटीक्स), द डर्टी पिक्चर आणि कहानी असे अभिनयासाठी चार फिल्मफेअर तिला मिळाले आहेत.

'राज'कुमार

विशेष म्हणजे हरहुन्नरी अभिनेता राजकुमार रावनेही या सोहळ्यात तब्बल दोन फिल्मफेअर पटकावले. ट्रॅप्ड चित्रपटातील भूमिकेसाठी क्रिटीक्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि बरेली की बर्फी चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार राजकुमारला मिळाला.

पुरस्कारांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट : हिंदी मीडियम
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटीक्स) : न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विद्या बालन (तुम्हारी सुलू)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : इरफान खान (हिंदी मीडियम)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटीक्स) : राजकुमार राव (ट्रॅप्ड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) : झायरा वसिम (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकोणा सेन शर्मा (अ डेथ इन द गुंज)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर वीज (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश केवल्य (शुभमंगल सावधान)
सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशीष भुतियानी (मुक्ती भवन)
सर्वोत्कृष्ट मूळ कथा : अमित न्यूटन (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : जग्गा जासूस
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंग (रोके ना रुके नैना- बद्रीनाथ की दुल्हनिया)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचडी फिरा-सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा- जग्गा जासूस)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : विजय गांगुली आणि रुएल दौसन वरिंदानी (गलती से मिस्टेक- जग्गा जासूस)
जीवनगौरव पुरस्कार : माला सिन्हा आणि बप्पी लाहिरी

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: jio filmfare awards 2018 : Vidya Balan and Irrfan Khan bags award latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV