'पाप'च्या खिल्लीमुळे नाराज, जॉनची 'कॉमेडी नाईट्स'मधून एक्झिट

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 10 November 2016 11:37 PM
'पाप'च्या खिल्लीमुळे नाराज, जॉनची 'कॉमेडी नाईट्स'मधून एक्झिट

मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा’ या ‘कलर्स’ वाहिनीवरील विनोदी शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनला आलेला अभिनेता जॉन अब्राहम कलाकारांच्या टिप्पणीनंतर काहीसा नाराज झाला आहे. सूत्रसंचालक कृष्णाने ‘पाप’ या त्याच्या सिनेमाची खिल्ली उडवल्याने जॉनने शोमधून काढता पाय घेतला.

आगामी ‘फोर्स 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॉन ‘कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा’च्या सेटवर गेला होता. जॉनसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही उपस्थित होती. यावेळी कृष्णाने ‘पाप’ सिनेमाची उडवलेली खिल्ली जॉनला सहन झाली नाही, आणि तो नाराज होऊन निघून गेल्याचं सांगितलं जातं.

‘जॉन आणि मी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी खूप खिन्न झालेलो, मात्र जॉन हा एकमेव अभिनेता आहे, ज्याने त्या काळातही मला पाठिंबा दिला. मात्र त्याला दुखावल्यामुळे मलाही खूप त्रास होत आहे’ असं ‘कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा’चा सूत्रसंचालक कृष्णा म्हणतो.

‘मी त्याच्या काही जुन्या चित्रपटांची टेर उडवली. यावेळी पाप सिनेमाचीही मी गंमत केली. त्यावर जॉनने तो आपला आवडता सिनेमा असल्याचं सांगितलं. त्यानंतर जॉन बहुदा मनोमन दुखावला गेला असावा. त्याने सोनाक्षी आणि माझ्यासोबत डान्स करायलाही नकार दिला आणि निघून गेला’ असंही कृष्णाने सांगितलं.

‘मी त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे गेलो. पण तो निघून गेला. मला त्याची माफी मागायची आहे. मला त्या दिवसापासून झोप लागलेली नाही. जॉन शोमध्ये यायला तयार असल्याचं समजताच मी मनालीत सुरु असलेलं माझ्या सिनेमाचं शूटिंग मध्येच सोडून खास त्याच्यासाठी इथे आलो होतो. तो मला माफ करेल, असं वाटतं’ अशी आशा कृष्णाने व्यक्त केली आहे.

‘कॉमेडी नाईट्स..’ मध्ये काळ्या रंगावरुन खिल्ली, तनिष्ठाचा संताप

यापूर्वी ‘पार्च्ड’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीच्या वर्णावरुनही याच शोमध्ये टिपणी करण्यात आली होती. त्यावर तिने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कृष्णा आणि कलर्स वाहिनीच्या वतीने तिची माफी मागण्यात आली.

First Published: Thursday, 10 November 2016 11:37 PM

Related Stories

झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगेशी

'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?
'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?

मुंबई: दोन वर्षापासून चर्चेत असलेला बाहुबली सिनेमा पुन्हा एकदा

...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार
...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

मुंबई : “मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर

रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच...

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!

मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलिवूडचे सुपरमॅन

सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?
सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आणि कृती सेननच्या ‘राबता’ सिनेमाचा

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले
सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले

मुंबई : ग्लॅमरस अंदाज आणि बिंधास्त स्वभावामुळे प्रसिद्ध असणारी

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली
अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनेक वेळा त्यांच्या ट्वीट्समुळे