जुडवा-2 सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 100 कोटींची कमाई

जुडवा-2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अवघ्या आठ दिवसात या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.

जुडवा-2 सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 100 कोटींची कमाई

मुंबई : जुडवा-2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली, हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून अवघ्या आठ दिवसात या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.

मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर या सिनेमाबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं आतापर्यंत 102 कोटींची कमाई केली आहे.

जुडवा-2ची कोणत्या दिवशी किती कमाई?

पहिला दिवस : 16.10 कोटी रुपये 

दुसरा दिवस : 20.55 कोटी रुपये

तिसरा दिवस : 22.60 कोटी रुपये

चौथा दिवस : 18 कोटी रुपये

पाचवा दिवस : 8.05 कोटी रुपये

सहावा दिवस : 6.72 कोटी रुपये

सातवा दिवस : 6.06 कोटी रुपये

आठवा दिवस : 4.25 कोटी रुपये

एकूण कमाई : 102 कोटी

taran1

हा सिनेमा येत्या काही दिवसात आणखी कमाई करेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

100 कोटी कमावणारा हा या वर्षीचा सातवा सिनेमा आहे. याआधी 'रईस' (137.51 कोटी), काबिल (103.84 कोटी), जॉली एलएलबी 2 (117 कोटी), बद्रीनाथ की दुल्हनिया (116.68 कोटी), बाहुबली (510 कोटी), ट्यूबलाइट (119.26 कोटी), टॉयलेट- एक प्रेम कथा (134 कोटी) या सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

जुडवा -2 हा सिनेमा सलमानच्या 'जुडवा'चा रिमेक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV