म्हणून जुही चावला-आमीर खानमध्ये पाच वर्षांचा अबोला

'इश्क' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका भांडणाची कटुता दीर्घकाळ टिकली.

By: | Last Updated: > Tuesday, 14 November 2017 10:31 AM
Juhi Chawla and Aamir Khan did not talk to each other for five years after Ishq latest update

मुंबई : ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून गाजलेली जोडी म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि ब्यूटी विथ ब्रेन जुही चावलाची. जुही आणि आमीर यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केल्यामुळे चाहत्यांनाही त्यांची जोडी आवडत होती. मात्र जुही-आमीर एकमेकांशी तब्बल पाच ते सहा वर्ष बोलत नव्हते.

जुही चावला आणि आमीर एकमेकांचे बेस्ट फ्रेण्ड्स होते. दोघांमध्ये घट्ट मित्रांप्रमाणे शेअरिंग आणि केअरिंग होतं. दोघांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन वादावादी व्हायची, मात्र हे रुसवे-फुगवे काही वेळातच मिटायचे. ‘इश्क’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका भांडणाची कटुता मात्र दीर्घकाळ टिकली.

कयामत से कयामत तक (1988) नंतर लव्ह लव्ह लव्ह (1989), तुम मेरे हो (1990), दौलत की जंग (1992), हम है राही प्यार के (1993), अंदाज अपना अपना (1994), आतंक ही आतंक (1995), इष्क (1997) असे सलग आठ सिनेमा त्यांनी एकत्र केले. मात्र इष्कनंतर दोघांचा एकही एकत्रित (लक बाय चान्स आणि बॉम्बे टॉकिज सारख्या मल्टिस्टारर गेस्ट अपिअरन्सचे अपवाद वगळता) सिनेमा आलेला नाही.

इश्क नंतर आमीर आणि जुही तब्बल पाच ते सहा वर्ष एकमेकांचं तोंडही बघत नव्हते. जुहीला आपल्याशी बोलायचं नाही, असा आमीरचा समज झाला, तर आमीरला हे भांडण सोडवण्यात रस नाही, असा ग्रह जुहीने करुन घेतला. त्यामुळे दोघांचा अबोला अनेक वर्ष टिकून राहिला.

अखेर, पाच वर्षांनी जुहीने पुढाकार घेतला आणि आमीरसोबत असलेली कटुता संपवली. दोघांमधले गैरसमज दूर झाले आणि पुन्हा ते एकमेकांचे चांगले मित्र झाले.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Juhi Chawla and Aamir Khan did not talk to each other for five years after Ishq latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु