ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप

बहुतेक आमीर खानच ट्विटर चालवतो, म्हणून इतक्या सहजपणे माझं अकाऊण्ट बंद करण्यात आलं. मात्र आपली वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल असून तिथे या सिनेमाबद्दल बोलणार, असं कमाल खान म्हणाला.

ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप

मुंबई : ट्विटरवर बॉम्ब फोडणारा अभिनेता कमाल खानलाच ट्विटरने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. अभिनेता आमीर खानवर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी केआरकेचं ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

सिनेमा रिलीज होण्याच्या दोन-तीन दिवस आधी कमाल खान त्याचा रिव्ह्यू लिहून ट्विटरवर लिंक पोस्ट करतो. आमिर खानची भूमिका असलेल्या 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाचाही रिव्ह्यू त्याने दिला. अनेकांनी त्याचं कौतुक केलं असताना केआरकेने मात्र हा बेकार सिनेमा असल्याचं म्हटलं.

कमाल खानने रिव्ह्यूमधून 'सिक्रेट सुपरस्टार'चा शेवट फोडला, तर आमीर खानच्या वडिलांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

ट्विटर अकाऊण्ट सस्पेंड केल्यानंतर कमाल खानने फेसबुकवर आगपाखड केली आहे. 'मी कठोर मेहनत घेतली, तेव्हा कुठे 60 लाख फॉलोव्हर्स झाले. असं वाटतं आमीर खानच ट्विटर चालवतो, म्हणून इतक्या सहजपणे माझं अकाऊण्ट बंद करण्यात आलं. मात्र आपली वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल असून तिथे या सिनेमाबद्दल बोलणार' असं कमाल खान म्हणाला.

https://twitter.com/KRKBoxOffice/status/920663109022470144

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV