'माझं करिअर संपलं, तरीही माझ्याकडं गमावण्यासारखं काही नाही'

अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठी चर्चेत आहे. आता तिने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपलं करिअर संदर्भात भाष्य करुन, सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

By: | Last Updated: > Monday, 11 September 2017 12:21 PM
kangana-ranaut says even if my journey ends now i have nothing to lose

मुंबई : बॉलिवूडमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठी चर्चेत आहे. आता तिने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपलं करिअर संदर्भात भाष्य करुन, सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘माझं करिअर संपलं, तरीही आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नसल्याची,’ भावना व्यक्त केली आहे. तसेच तिने आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये प्रचंड आत्मविश्वास कमावल्याचेही तिने यावेळी सांगितलं.

पीटीआयला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत कंगना म्हणते की, ”मी माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या मनातल्या भीतीवर विजय मिळवला. तसेच स्वत:चं मुल्यमापन करण्याचा प्रयत्न केला. आज मला आनंद आहे की, मी स्वत: ला, स्वत:च्या व्यवहाराला, एक महिला म्हणून स्वत: मधील क्षमतांना जाणू शकले. मला जेव्हा समजतही नव्हतं, त्या वयाच्या 15 व्या वर्षात मी माझं घर सोडलं. पण आज वयाच्या 30 व्या वर्षी मी आता स्वत: ला ओळखू शकले.”

ती पुढे म्हणाली की, ”सध्या माझ्या मनात मी काहीतरी कमावल्याची भावना आहे. मला तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच बॉक्स ऑफिसवरही माझ्या सिनेमांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळे माझा प्रवास इथंच संपला, तरी माझ्याकडे आता गमावण्यासारखे काही नाही. आता उर्वरित आयुष्यात मी माझ्या यशाबद्दल सर्वांना सांगू शकते.”

मनातल्या भीतीवर बोलताना कंगना म्हणाली की, ” आज मला भीती कशाची वाटली पाहिजे? कारण, मी जेव्हा घर सोडलं, तेव्हा मला स्वावलंबी बनायचं होतं. पण आता मी मेगास्टार आहे. मी एक अशी महिला आहे, जी स्वत: ला पूर्णपणे ओळखते. अन्, एका महिलेसाठी हे मोठं आव्हान असतं. त्यामुळे आता जर मी घाबरले, तर मी आयुष्यभर भीत-भीतच जगेन.”

दरम्यान, या मुलाखतीत बोलताना तिने भविष्याविषयी प्लॅनिंग केलं असल्याचंही जाणवत होतं. ती म्हणाली की, ”मी मनालीमध्ये एक सुंदरसं घर घेतलं आहे. मला आता तिथं राहायचं आहे. पुस्तक लेखन करायचं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचीही माझी इच्छा आहे.”

दुसरीकडे कंगनाने नुकत्या ‘आप की आदालत’ या टीव्ही शोमध्ये हृतिक रोशन, केतन मेहता, आदित्य पंचोली आदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर हृतिकच्या समर्थनार्थ त्याची घटस्फोटीत पत्नी सुजैन खान उभी राहिली होती. यावरुनही कंगनाने आपलं मत मांडलं. ती म्हणाली की, ”सध्या मी यावर कोणतंही वक्तव्य करणार नाही. कारण यासंदर्भात माझं काही देणं-घेणं नाही.”

दरम्यान, हंसल मेहता दिग्दर्शित कंगनाचा आगामी सिनेमा सिमरन येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

संबंधित बातम्या

कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:kangana-ranaut says even if my journey ends now i have nothing to lose
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही

विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर नाराज?
विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/09/2017

  कर्जमाफीसाठी एकूण 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांचे अर्ज, मात्र 2

बलात्कार प्रकरणी भोजपुरी अभिनेत्याला अटक, पत्नीलाही बेड्या
बलात्कार प्रकरणी भोजपुरी अभिनेत्याला अटक, पत्नीलाही बेड्या

मुंबई : बलात्कार प्रकणात अटक असलेला भोजपुरी अभिनेता मनोज पांडे