मनालीत कंगनाच्या आलिशान बंगल्याची किंमत 30 कोटी?

या बंगल्यामध्ये तब्बल आठ बेडरुम्स आहेत. घरातील कुठलीही खिडकी उघडली, तरी समोर डोंगरांचं रम्य दृश्य पाहायला मिळतं.

मनालीत कंगनाच्या आलिशान बंगल्याची किंमत 30 कोटी?

मुंबई : बॉलिवूडची 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावत या न् त्या कारणाने बातम्यांमध्ये असते. यावेळी मनालीतील कंगनाच्या पॉश घराची चर्चा आहे. डोंगर-दऱ्यांमध्ये असलेल्या या घराची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. या बंगल्याची किंमत थोडीथोडकी नाही, तर तब्बल 30 कोटी रुपये आहे.

2014 मध्ये 'क्वीन' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर कंगनाने 10 कोटी रुपयांना मनालीत जमीन खरेदी केल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आहेत. चार वर्षांच्या परिश्रमानंतर हा बंगला बांधून तयार झाला आहे. बंगल्यावर झालेला खर्च धरुन ही किंमत 30 कोटींवर पोहचली आहे.

Kangana Ranaut Manali Bungalow 2

कंगनाचा बंगला अत्यंत देखणा असल्याचं काही जण सांगतात. या बंगल्यामध्ये तब्बल आठ बेडरुम्स आहेत. घरातील कुठलीही खिडकी उघडली, तरी समोर डोंगरांचं रम्य दृश्य पाहायला मिळतं. प्रत्येक खोलीला स्टेप-आऊट बाल्कनी आहे.

इतकंच नाही, तर वरच्या मजल्यावर रुफटॉप ऑब्झर्व्हेटरी आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश खेळता राहावा, याची पुरेपूर काळजी आर्किटेक्ट्सनी घेतली आहे. लिव्हिंग रुममध्ये फायरप्लेसची सोय करण्यात आली आहे.

Kangana Ranaut Manali Bungalow

बंगल्याच्या डायनिंग रुमची एक भिंत काचेची बांधण्यात आली आहे. त्यामुळे जेवतानाही डोंगरांचा व्ह्यू पाहता येईल. त्याचप्रमाणे जिम आणि योग रुमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

चार वर्ष बंगल्याच्या कामाचे अपडेट्स घेण्यासाठी कंगनाने वेळोवेळी मनालीला भेट देत होती. शबनम गुप्ता यांनी बंगल्याचं डिझाईन केलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kangana Ranaut’s Manali bungalow costs Rs 30 crore? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV