'मणिकर्णिका'मध्ये कंगनाचा रॉयल अंदाज

कंगना पहिल्यांदाच अशाप्रकारची अगदी रॉयल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. तिचा पेहराव, दागिने इत्या सर्व महाराणीला शोभणारे दिसतात.

'मणिकर्णिका'मध्ये कंगनाचा रॉयल अंदाज

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आपल्या आगामी 'मणिकर्णिका' सिनेमात महाराणीच्या रुपात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी एका चित्राद्वारे कंगनाचा लूक कसा असेल, हे दाखवण्यात आले होते.

चित्राच्या माध्यमातून कंगनाचा 'मणिकर्णिका'मधील लूकबाबत फक्त अंदाज लावता येत होता. मात्र आता ती प्रतीक्षा संपली असून, 'मणिकर्णिका'मधील कंगनाचा लूक समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/Ba654BxjgFr/?taken-by=kangsranaut

'मणिकर्णिका' सिनेमाची शूटिंग सुरु असातना सेटवरुनच हा फोटो लीक झाला आहे. कारण सिनेमाच्या निर्मात्याने किंवा दिग्दर्शकाने हा लूक अद्याप रिलीज केला नाही.

कंगना पहिल्यांदाच अशाप्रकारच्या अगदी रॉयल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. तिचा पेहराव, दागिने इत्या सर्व महाराणीला शोभणारे दिसतात.

जयपूरमध्ये सध्या सिनेमाची शूटिंग सुरु असून, कंगनाच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kangana Ranaut’s Royal Look latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV