... म्हणून सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाला, कपिल शर्माचं स्पष्टीकरण

ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात बोलताना कपिलने यावर्षाच्या सुरुवातीला सहकारी कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकरसोबत झालेल्या वादाबाबतही खुलासा केला.

... म्हणून सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाला,  कपिल शर्माचं स्पष्टीकरण

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचा फिरंगी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात बोलताना कपिलने यावर्षाच्या सुरुवातीला सहकारी कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकरसोबत झालेल्या वादाबाबतही खुलासा केला.

''ऑस्ट्रेलियाहून परतताना सुनील ग्रोव्हरसोबत काहीही वाद झाला नाही. तेव्हा मी तणावात होतो. ऑस्ट्रेलियामधील शुटिंगही रद्द करण्याची इच्छा होती. मात्र तिकिटांची ऑनलाईन विक्री झालेली असल्यामुळे ते शक्य झालं नाही’’, असं कपिल शर्मा म्हणाला.

''शोच्या सुरुवातीला टीममधील दोन सदस्यांसोबत वाद झाला होता. एक मुलगी माझ्याकडे रडत रडत आली, तिचा माझ्या बालपणीच्या मित्रासोबत वाद झाला होता. मी देखील तेव्हा काय झालंय हे माहित न करुन घेता चंदनवर रागावलो. त्यानंतर चंदन हॉटेलच्या बाहेर गेला आणि पाच दिवसांनी परतताना दिसला. त्यादिवशी मी पुन्हा चंदनवर ओरडलो. ते पाहून सुनील चिडला आणि आमच्यात वाद झाला’’, असा खुलासा कपिलने केला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV