कपिल शर्माच्या 'फिरंगी'चा ट्रेलर रिलीज

10 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

कपिल शर्माच्या 'फिरंगी'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : कपिल शर्माच्या आगामी फिरंगी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'किस किस को प्यार करु' या सिनेमानंतर कपिलचा हा दुसरा सिनेमा आहे. कपिलसोबत या सिनेमात इशिता दत्त आणि मोनिका गिल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील.

फिरंगी या सिनेमाची जास्तीत जास्त शुटिंग पंजाब आणि राजस्थानमध्ये झाली आहे. कपिल शर्मा स्वतः या सिनेमाचा निर्माता देखील आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन राजीव ढिंगरा यांनी केलं आहे. 10 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्माचा हा दुसरा सिनेमा आहे. 'किस किस को प्यार करु' या सिनेमातून कपिलने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. त्यामुळे आता या दुसऱ्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

पाहा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV