मला शाहरुखशी लग्न करायचंय... : करण जोहर

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 20 March 2017 9:13 PM
मला शाहरुखशी लग्न करायचंय... : करण जोहर

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक करण जोहर आणि किंग खान शाहरुखचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. या दोघांच्या मैत्री बद्दल नेहमीच चर्चा होते. पण नुकतीच करणने आपल्या या खास मित्राबद्दल अशी काही भावना व्यक्त केलीय, ज्यामुळे सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. करण एका कार्यक्रमामध्ये बोलताना आपल्याला शाहरुखसोबत लग्न करायचंय, अशी भावना व्यक्त केली.

वास्तविक, इंडिया टुडे साप्ताहिकाच्या ‘इंडिया टुडे कॉनक्लेव-2017’ च्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी करणला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. या कार्यक्रमावेळी त्याला शाहरुख खान, ऐश्वर्या राय-बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी कोणासोबत लग्न करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना, करणने स्मित हास्य करुन ऐश्वर्या आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना बाजुला सारुन शाहरुखशीच लग्न करेन, असं सांगितलं. याचं कारण स्पष्ट करताना, त्याचं घर प्रचंड आवडत असल्याने, त्यानिमित्त शाहरुखच्या घरात 24 तास राहण्याची संधी मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान, यानंतर गंभीर झालेल्या करणने लोक काहीही म्हणतात, असं म्हणत विषय टाळला. तसेच सत्यापेक्षा गॉसिपिंग वेगळं असतं, असं मतही यावेळी नोंदवलं.

First Published: Monday, 20 March 2017 9:13 PM

Related Stories

अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली
अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनेक वेळा त्यांच्या ट्वीट्समुळे

सोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट
सोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट

मुंबई : अजानसंदर्भातील वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आलेल्या सोनू

पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज
पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज

पुणे : मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने

सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!
सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!

मुंबई: मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने

पतौडी कुटुंबात नवा पाहुणा येणार!
पतौडी कुटुंबात नवा पाहुणा येणार!

मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर खान तैमूरचे आई-बाबा बनल्यानंतर आता

खरंच सोनम कपूरला राष्ट्रगीत येत नाही?
खरंच सोनम कपूरला राष्ट्रगीत येत नाही?

मुंबई : सोशल मीडियावर एखादा नेता, अभिनेता/अभिनेत्री तसंच इतर

सचिनलाही डिस्काउंट देण्यास बीसीसीआयचा नकार
सचिनलाही डिस्काउंट देण्यास बीसीसीआयचा नकार

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिनच्या जीवनावर आधारित ‘सचिन : अ बिलियन्स

अभिनेता भरत जाधव यांना पितृशोक
अभिनेता भरत जाधव यांना पितृशोक

कोल्हापूर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाने

....म्हणून 32 वर्षांचा तरुण अभिनेता झाला 324 वर्षांचा वृद्ध
....म्हणून 32 वर्षांचा तरुण अभिनेता झाला 324 वर्षांचा वृद्ध

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूत आणि कृति सेनन यांचा

धनुषचे खरे आई-वडील कोण? अखेर निकाल लागला
धनुषचे खरे आई-वडील कोण? अखेर निकाल लागला

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता धनुषचे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या