करिना कपूरचा बॉबीला डच्चू, शाहिदची निवड?

करिना आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इम्तियाजने गीतच्या भूमिकेसाठी करिनाची निवड केल्यानंतर तिने आदित्यच्या व्यक्तिरेखेसाठी शाहिदचं कास्टिंग करण्याची गळ घातली, असं म्हटलं जातं.

करिना कपूरचा बॉबीला डच्चू, शाहिदची निवड?

मुंबई : करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचा 'जब वि मेट' हा दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. करिनाने साकारलेली गीत तिचे चाहते कधीच विसरु शकणार नाहीत. मात्र करिनासोबत या चित्रपटात देओलपुत्र बॉबी झळकू शकला असता. खुद्द बॉबीने ही माहिती दिली आहे.

जब वि मेटमध्ये शाहिदने साकारलेल्या आदित्य कश्यपच्या भूमिकेसाठी बॉबी देओलच्या नावाचा विचार झाला होता. 'हफिंग्टन पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबीनेच ही माहिती दिली आहे. त्यामुळे बॉबीच्या करिअरची नौका बुडायला एकप्रकारे करिनाच कारणीभूत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

त्यावेळी करिना आणि शाहिद एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इम्तियाजने गीतच्या भूमिकेसाठी करिनाची निवड केल्यानंतर तिने आदित्यच्या व्यक्तिरेखेसाठी शाहिदचं कास्टिंग करण्याची गळ घातली, असं म्हटलं जातं.

''मी 'जब वि मेट'मध्ये मुख्य भूमिका साकारणार होतो. त्या सिनेमाचं नाव आधी 'गीत' ठेवण्यात आलं होतं. अभय देओल-आयेशा टाकियाचा 'सोचा ना था' पाहून मी प्रचंड प्रभावित झालो होतो. मी त्याला गाठलं आणि तू खूप छान 'स्टोरीटेलर' असून तुझं भवितव्य उज्ज्वल असल्याचं सांगितलं. त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही मी व्यक्त केली. त्यावेळी त्याच्याकडे 'जब वि मेट'ची स्क्रिप्ट होती. तो फायनान्सर शोधत होता.'' असं बॉबीने सांगितलं.

मी इम्तियाजसाठी काही प्रॉडक्शन हाऊसशी बोललो. मात्र इम्तियाज नवखा असल्यामुळे कोणी फारशी उत्सुकता दाखवली नसल्याचं बॉबीने सांगितलं.

'काहीच दिवसात मला समजलं अष्टविनायकने इम्तियाजच्या नव्या सिनेमात करिना आणि तिचा बॉयफ्रेंड शाहिदचं लीड रोलसाठी कास्टिंग केलंय आणि सिनेमाचं नाव जब वि मेट ठेवलंय. हे ऐकून मला धक्का बसला' असं बॉबी सांगतो. मात्र इम्तियाज चांगला दिग्दर्शक असून त्याच्याविषयी कोणतीही वाईट भावना नसल्याचं बॉबीने स्पष्ट केलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV