करिनाचं 'हे' डेनिम जॅकेट घेण्यासाठी तुमचे किती पगार जातील?

हे जॅकेट म्हणजे एखाद्या नवख्या तरुणाचा सहा-सात महिन्यांचा पगार आहे, असं कोणी म्हणालं. तर कोणी याची तुलना थायलंडमधील तीन दिवसांच्या हॉलिडेशी केली.

करिनाचं 'हे' डेनिम जॅकेट घेण्यासाठी तुमचे किती पगार जातील?

मुंबई : फॅशन आणि स्टाईलबाजीमध्ये बॉलिवूडची लाडकी बेबो, अर्थात करिना कपूर खानचा हात कोणीच धरु शकणार नाही. करिना नुकतीच 'बॅलेन्सियागा'चं डेनिम जॅकेट घालून मिरवताना दिसली.

करिनाच्या या जॅकेटची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. हे डेनिम जॅकेट घेण्यासाठी तुम्हाला तुमचे किती पगार पूर्णपणे खर्ची घालावे लागतील, याची तुम्हीच मोजदाद करा. 'बॅलेन्सियागा' ब्रँडच्या या डेनिम जॅकेटची किंमत आहे तब्बल 1295 डॉलर. म्हणजेच अंदाजे 84 हजार रुपयांच्या घरात.

जॅकेटची 84 हजार रुपये किंमत ऐकून नेटिझन्सही चक्रावले आहेत. हे जॅकेट म्हणजे एखाद्या नवख्या तरुणाचा सहा-सात महिन्यांचा पगार आहे, असं कोणी म्हणालं. तर कोणी याची तुलना थायलंडमधील तीन दिवसांच्या हॉलिडेशी केली.

Balenciaga Denim Jacket

'वीरे दे वेडिंग'मधून करिना पहिल्यांदाच प्रेग्नन्सीनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एका आगामी गाण्याच्या शूटसाठी करिना थायलंड निघाली होती. त्यावेळी मुंबई विमानतळावर ही बॉलिवूडची दिवा दिसली. वीरे दी वेडिंगमध्ये करिनासोबत स्वरा भास्कर, सोनम कपूर झळकणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी 28 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kareena Kapoor Khan’s Balenciaga denim jacket is worth 84 thousand latest upd
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV