बॉयफ्रेण्डचा घटस्फोट, करिश्मा कपूर पुन्हा बोहल्यावर चढणार!

सात वर्ष घटस्फोटाच्या लढाईनंतर परस्पर संमतीने वैवाहिक आयुष्य संपवून संदीप तोषणीवाल अखेर पत्नीशी विभक्त झाला.

By: | Last Updated: > Wednesday, 8 November 2017 11:41 AM
Karishma Kapoor to tie knot again, boyfriend Sandeep Toshniwal gets divorced from wife

मुंबई : बॉलिवूडच्या कपूर कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे सूर ऐकायला मिळणार आहेत. कपूर खानदानची मुलगी करिश्मा कपूर पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. करीश्मा लवकरच बॉयफ्रेण्ड आणि दिल्लीतील बिझनेसमन संदीप तोषणीवालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

सात वर्ष घटस्फोटाच्या लढाईनंतर परस्पर संमतीने वैवाहिक आयुष्य संपवून संदीप तोषणीवाल अखेर पत्नीशी विभक्त झाला. संदीप तोषणीवालने सोमवारी वांद्र्यातील कौटुंबिक न्यायालयात पत्नीकडून घटस्फोट घेतला. संदीप तोषणीवाल आणि त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता यांनी परस्पर संमतीने 14 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला.

करीश्मा कपूर आणि संदीप तोषनीवाल तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. संदीपने 2010 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सात वर्ष संदीप आणि पत्नी दोघांमध्ये घटस्फोटासाठी लढाई सुरु होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघे वाटाघाटीसाठी तयार झाल्याने घटस्फोटाची कारवाई पुढे सरकली.

घटस्फोटाच्या वाटाघाटीसाठी तोषणीवाल दोन्ही मुलींच्या (12 वर्ष आणि 9 वर्ष) पालनपोषणासाठी 3-3 कोटी रुपये देणार असून पत्नी अश्रिताला 2 कोटी रुपयांची पोटगी देणार आहे. याशिवाय अश्रिता आता जिथे राहते ते दिल्लीतील घरही तिच्याच नावावर असेल. तसंच दोन्ही मुलींचा ताबा आईकडेच राहिल.

दुसरीकडे करीश्मानेही मागील वर्षी पती संजय कपूरकडून घटस्फोट घेतला होता. संजय कपूर हा दिल्लीतील प्रसिद्ध बिझनेसमन आहे. दोघांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटानंतर संजयने आता प्रिया सचदेवशी लग्न केलं आहे. प्रिया सचदेव ही प्रसिद्ध हॉटेल मालक विक्रम चटवालची पत्नी होती.

संबंधित बातम्या

घटस्फोटानंतर करिश्मा कपूर बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार!

करिश्मा-संजयचा अखेर घटस्फोट, मुलांना 10 कोटी, डुप्लेक्स बंगला

करिश्मा-संजय यांच्यात घटस्फोटावर सहमती, करिश्माकडे मुलांचा ताबा

करिश्माने पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं : संजय कपूर

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Karishma Kapoor to tie knot again, boyfriend Sandeep Toshniwal gets divorced from wife
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु